शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेत ऑनलाईन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:12 AM2021-04-04T04:12:30+5:302021-04-04T04:12:30+5:30
संगीत विभागप्रमुख पुर्णिमा दिवसे यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनात सुधीर मोहोड आणि मुक्ता महल्ले हे सदर उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे. ...
संगीत विभागप्रमुख पुर्णिमा दिवसे यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनात सुधीर मोहोड आणि मुक्ता महल्ले हे सदर उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे. त्यांनी सांगेतिक घराणे निर्मिती नियम, परंपरा, गायन शैली याविषयी सविस्तर माहिती विशद केली. यात ग्वालियर, आग्रा, किराणा, जयपूर पटियालाबद्दल परिचय करून दिला. एम.ए.चा विद्यार्थी अनुराग बाभुळकर याने सरस्वती सरस्वती स्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरू केली. सागर भालचक्र याने संचालन व मुक्त महल्ले यांनी आभार व्यक्त केले.
चंद्रकिरण घाटे यांचे १३ मार्च रोजी व्याख्यान झाले. २० मार्च रोजी नीरज लांडे यांचे सप्रयोग व्याख्यान पार पडले. यात तोडी थाटातील बिलासखानी तोडी, मुलतानी, गुजरी तोडी आदी रागाची सप्रयोग माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद तसेच बी.ए., एम.ए.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.