लसीकरणासाठी ऑनलाईन नोंद नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:51+5:302021-07-04T04:09:51+5:30
अमरावती : प्रशासनाच्या आवाहनानुसार कोविन ॲपवर ऑनलाईन नोंदणी केली असताना येथील नर्सिंग केंद्रावर लसीकरण करण्यास नकार देण्यात आला. याउलट ...
अमरावती : प्रशासनाच्या आवाहनानुसार कोविन ॲपवर ऑनलाईन नोंदणी केली असताना येथील नर्सिंग केंद्रावर लसीकरण करण्यास नकार देण्यात आला. याउलट त्या नागरिकांना चार तास रांगेत उभे केल्यानंतर ऑफलाईन लसीकरण करण्याचा प्रकार शनिवारी घडला.
नागरिक ऑनलाईन नोंदणीच्या प्रिंटसह शनिवारी सकाळी १० वाजता नर्सिंग प्रशिक्षण केंद्रावर पोहोचले. यावेळी तेथील केंद्रप्रमुखांनी ॲपवरील नोंदणी मान्य नसल्याने सांगत रांगेत उभे केल्याची आपबीती ज्येष्ठ नागरिक गणेश महाजन यांनी सांगितली. यादरम्यान काही नागरिकांना आत बोलावून तात्काळ लसीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाजन यांनी या केंद्रासाठी ॲपवर ऑनलाईन नोंदणी केली. त्यांचा कोड ९६९३ असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी १२ ते १ दरम्यान त्यांना वेळ देण्यात आला होता. ते सकाळी १० वाजता केंद्रावर पोहोचले. तथापि, त्यांना माघारी पाठवून रांगेत उभे केले गेले. मग लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीची कसरत कशासाठी, असा सवाल त्यांनी केला आहे.