शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:24 PM2018-05-31T22:24:46+5:302018-05-31T22:24:46+5:30
जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीप्रक्रिया अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे तक्रारींना अजिबात वाव मिळाला नाही. स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये ४४० शिक्षक कार्यरत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीप्रक्रिया अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे तक्रारींना अजिबात वाव मिळाला नाही
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये ४४० शिक्षक कार्यरत आहेत. बदलीपात्र १८९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात दोन मुख्याध्यापक, ३६ पदवीधर शिक्षक व १५१ प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक खाडे व शिक्षण विस्तार अधिकारी देविदास खुराडे यांनी तातडीने पात्र शिक्षकांना बदली आदेश बजावले. स्थानांतरित ठिकाणी रूजू होण्यासाठी चांदूर बाजार पंचायत समितीमधून कार्यमुक्त केले.
यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या या पदाधिकाºयांच्या मर्जीनुसार व्हायच्या. त्यामुळे बदलीच्या मोसमात अनेक शिक्षक त्यांचे उंबरठे झिजवताना दिसून येत होते. परंतु, या आॅनलाइन बदल्यांमुळे आर्थिक व्यवहाराला चाप बसला आहे. या प्रक्रियेत पदाधिकाºयांचा हस्तक्षेप नसल्याने कार्यालये ओस पडली आहेत