केवळ १५ रुपये प्रतिकिलो : ९० टक्के शेतकऱ्यांनी विकली संत्री

By admin | Published: January 13, 2016 12:19 AM2016-01-13T00:19:53+5:302016-01-13T00:19:53+5:30

यावर्षी संत्रा पिकाचे भाव पडल्याने शेतकऱ्याने आपल्या बागेतील संत्रा पडक्या भावात विकावा लागला.

Only 15 bucks per kg: 90% of the workers sold by farmers | केवळ १५ रुपये प्रतिकिलो : ९० टक्के शेतकऱ्यांनी विकली संत्री

केवळ १५ रुपये प्रतिकिलो : ९० टक्के शेतकऱ्यांनी विकली संत्री

Next

सुमित हरकुट चांदूरबाजार
यावर्षी संत्रा पिकाचे भाव पडल्याने शेतकऱ्याने आपल्या बागेतील संत्रा पडक्या भावात विकावा लागला. आता शेतकऱ्यांचा संत्रा ९० टक्के विक्री झाला असताना संत्र्याचे भाव दुप्पट झाले असल्याने संत्र्याला सुलतानी संकटाने घेरले आहे.
विदर्भातील सुप्रसिद्ध असलेला संत्रा हे या भागातील शेतकऱ्यांचे अती महत्त्वाचे पीक आहे. विदर्भातील संत्र्याची गोडी जगप्रसिद्ध आहे. विदर्भातून हा संत्रा बंगळुरू, चेन्नई, केरळ, दिल्ली, कोलकाता, नेपाळ, श्रीलंकासारख्या परदेशातही पोहोचला आहे. तालुक्यातील संत्रा व्यवसायामुळे दरवर्षी हजारो मजुरांना काम मिळते. तसेच या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने देशभरातील व्यापारी संत्रा खरेदी करण्याकरिता तालुक्यात येतात. दररोज शेकडो ट्रक संत्रा देशाच्या कानाकोपऱ्यात विक्रीकरिता जातो.
यावर्षीसुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचे उत्पन्न झाले. मात्र यावर्षी संत्र्याला ४ ते ५ रूपये प्रतिकिलोचेच भाव मिळाले. मात्र काही दिवसातच हे भाव ७ रूपये किलोपर्यंत वाढले. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपले संत्रा ठेवण्यापेक्षा विकणे यालाच पसंती दिली. संत्रा हा झाडावर अधिक काळ ठेवणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या बागेतील संत्रा विकणे आवश्यक होऊन जाते. तसेच शेतकरी हा संत्रा तोडून जास्त काळ साठवून सुद्धा ठेवू शकत नाही नेमके याच संधीचा फायदा घेऊन व्यापारी वर्ग शेतकऱ्यांचा फायदा घेत संत्र्याला पडक्या भावाने खरेदी करतात, असा आरोप शेतकरी वर्गातर्फे होत आहे. तसेच सुरुवातीला संत्राचे भाव अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला माल विक्री करावा लागला.
अनेक शेतकऱ्यांना बागेतील संत्रा अल्पदरात विकून मिळेल त्या पैशावर समाधान मानावे लागले. मात्र अनेकांनी स्वत: हा संत्रा मोठ्या बाजारपेठांत विक्रीकरिता नेऊन नवीन व्यापारी पद्धत सुरू केली. गेल्या दोन महिन्यांपासून ९० टक्के शेतकऱ्यांनी आपला संत्रा विकला असून आता अचानक संत्राचे भाव दुप्पटीने वाढले आहे. त्यामुळे परिसरातील ९० टक्के शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेक शेतकऱ्यांनी आपले बगीचे कमी दरात विकण्याचा सौदा केला आहे. मात्र अद्यापही त्यांच्या बगिच्यातील संत्राची तोड झाली नाही. त्यामुळे अनेक व्यापारी कमी दरात घेतलेले बगिचे तोड करण्यास घाई करीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

शेतकऱ्यांनी विकली बेभाव संत्री
काही दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांतर्फे शेतकऱ्यांचा संत्रा खरेदी करताना देण्यात आलेला इसार सातत्याने भाव पडत असल्याने अनेक व्यापारींनी मालाची उचल न करता इसार सोडून दिले होते. त्यामुळे शेतकरी पार खचून गेला होता. अखेर कमी-जास्त भाव करून शेतकरी आपला संत्रा शेतातच सडू देण्यापेक्षा पडक्या भावाने विकण्यास तयार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा स्वत: शेतमालकांनी रस्त्याच्या कडेला दुकान थाटून संत्री विकली. काही शेतकऱ्यांनी संत्री ट्रकमध्ये भरून परप्रांतात विकण्यासाठी नेली होती.

Web Title: Only 15 bucks per kg: 90% of the workers sold by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.