अमरावती : बारवर दरोड्यात १७०० रुपयेच हाती लागले, ६ आरोपी जेरबंद
By प्रदीप भाकरे | Published: December 30, 2023 05:20 PM2023-12-30T17:20:56+5:302023-12-30T17:21:18+5:30
फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई, फरार आरोपींचा शोध
अमरावती : फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगरस्थित सचिन बारमध्ये १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ च्या सुमारास चाकूच्या धाकावर दरोडा टाकण्यात आला होता. बारच्या दाराच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. टोळक्यातील एकाने बारमालकाच्या खिशातून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सहाही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फ्रेजरपुरा पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
फ्रेजरपुरा पोलिसांनी सचिन जयस्वाल यांच्या तक्रारीवरून शेख सुफियान, निकेत वरघट, यश गडलिंग, राहुल श्रीरामे, गोट्या ऊर्फ प्रथमेश इंगोले व त्यांच्या १० ते १२ साथीदारांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. पैकी गुन्हयातील प्रमुख आरोपी सम्राट रविंद्र फुले (१९, रा. विश्वशांती बुदध विहाराजवळ वडाळी), प्रथम उर्फ गोटया रवींद्र इंगोले (२०, भातकुली पंचायत समिती क्वार्टर नं ७), यश प्रवीण गडलिंग (२१, संजय गांधीनगर), शेख सुफियान शेख इलियास (१९), अनिकेत उर्फ सोनु देवानंद वरघट (२१) व राहुल गौतम श्रीरामे (२१, तिघेही रा. गजानन नगर) यांना अटक करण्यात आली. यातील सम्राट फुले व गोटया इंगोले हे न्यायालयीन कोठडीत तर, उर्वरित चार आरोपी पोलीस कोठडीत आहेत.
अटक टाळण्याची घेतली होती खबरदारी
१५ डिसेंबर रोजी घटना घडताच सर्व आरोपी पसार झाले. सर्व आरोपी हे रेकार्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी अटक टाळण्यासाठी मोठी खबरदारी घेतली होती. मात्र, १४ दिवसानंतर का होईना फ्रेजरपुरा पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश आले. पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, एसीपी पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक हनुमंत डोपेवाड व निशांत देशमुख, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र सहारे, पीएसआय ज्योती देवकते, सुनील सोळंखे, रज्जाक शेखुवाले, शशिकांत गवई, सागर पंडीत, शेखर गायकवाड यांनी ही कारवाई केली.