दाणात दाण एकमेव रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:57+5:302021-06-19T04:09:57+5:30
कोरोना काळात कॉलेजेस बंद राहिल्याने शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढींमध्ये साठा संपत आलेला आहे. मात्र, सिकलसेल, हिमोफिलिया, ...
कोरोना काळात कॉलेजेस बंद राहिल्याने शिबिरे होऊ शकली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढींमध्ये साठा संपत आलेला आहे. मात्र, सिकलसेल, हिमोफिलिया, थॅलेसिमियाग्रस्तांना नियमित लागणारे रक्त कसे मिळविणार, यावर मंथन करून लोकमत मीडिया ऑडोटोरीयल हेड तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी स्व. जवाहरलाल ऊर्फ बाबूजींच्या जयंतीप्रीत्यर्थ येत्या २ जुलैपासून महारक्तदानाच्या माध्यमातून ही समस्या सोडविण्यास सहकार्याची संकल्पना आणली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी दिली रणमले यांनी ग्रामीण भागातील चौदाही ग्रामीण रुग्णालयांतर्गत रक्तदान शिबिराचे नियोजन केल्यास आमची यंत्रण आपल्या या महान कार्याला सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
------------------
सद्यस्थितीत शिबिरे नसल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा भासणार ही काळाची पावले ओळखून लोकमतने आखलेल्या महारक्तदान शिबिराच्या संकल्पनेचे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अनिल देशमुख यांनीदेखील लोकमतच्या या संकल्पनेचे स्वागत केले. दरम्यान नवतरुणांना या महारक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. पीडीएमसीतील रुग्णसेवेत कुठल्याही उणिवा राहू नये, या अनुषंगाने आमचे नियोजन राहिल्याने कोरोना काळातदेखील २०० शिबिरांच्या माध्यमातून वर्षभरात ११ हजार बॉटल्स रक्त गोळा करून गरजूंना पुरविल्याचे ते यावेळी म्हणाले.
बॉक्स
रक्तदान केल्याने दोघांना फायदा
शरीराला स्वस्थ ठेवण्याच्या अनुषंगाने मानवी शरीरातील प्रत्येक अवयव आपली कार्य पूर्ण करतात. त्याचप्रमाणे हिमोग्लोबीन रक्त तयार करते. त्याची प्रक्रिया स्थिर राहत असताना रक्तदान केल्यास त्याच गतीने नवीन रक्त शरीरात तयार होते. त्यामुळे रक्त तयार करण्याची प्रक्रिया गतीमान होऊन शरीराला स्वस्थ राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदान हे दात्याला गरजूला दोघांनाही लाभदायी ठरते, असे अनिल देशमुख म्हणाले.