स्टेट बँकेत फक्त रोखीचे व्यवहार, इतर व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:05+5:302020-12-15T04:30:05+5:30
धारणी : येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांमुळे ठप्प पडली आहे. केवळ शाखा प्रबंधक आणि रोखपाल अशा ...
धारणी : येथील भारतीय स्टेट बँकेची शाखा कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांमुळे ठप्प पडली आहे. केवळ शाखा प्रबंधक आणि रोखपाल अशा दोनच व्यक्ती बँकेचा व्यवहार सांभाळत आहेत. त्यामुळे फक्त रोखीचे घेवाण-देवाण सुरू ठेवून बाकीचे व्यवहार बंद झाले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. दूरवरून येणाऱ्या ग्राहकांना आपले काम होत नसल्यामुळे रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
गत आठवड्यापासून स्टेट बँकेची धारणी शाखा कोरोनामुळे चर्चेत आहे. सर्वसामान्य नागरिक बँकेत जाण्यासाठी घाबरत आहेत. अशा परिस्थितीतसुद्धा बँकेचे काम सुरू असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. सदर बँकेतील कर्मचारी यांना कोरोना हे आजार अपडाऊनमध्ये झाले किंवा कसे, याचा उलगडा झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्यामुळे लोक आतमध्ये घुसण्यासाठी घाबरू लागले आहेत. त्यामुळे आता फक्त बँकेत रोखीचे व्यवहार सुरू असून, इतर व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहेत.