-आता रेशनकार्ड मिळणार ‘आॅनलाईन’

By admin | Published: June 8, 2016 12:15 AM2016-06-08T00:15:39+5:302016-06-08T00:15:39+5:30

रेशनकार्ड काढण्यासाठी पुरवठा विभागात ताटकळत बसण्यापासून शासनाने दिलासा दिला आहे.

-Only get ration card | -आता रेशनकार्ड मिळणार ‘आॅनलाईन’

-आता रेशनकार्ड मिळणार ‘आॅनलाईन’

Next

खाद्य सुरक्षा योजना : ‘आरसीएमएस’ सॉफ्टवेअरचा वापर
अमरावती : रेशनकार्ड काढण्यासाठी पुरवठा विभागात ताटकळत बसण्यापासून शासनाने दिलासा दिला आहे. रेशनकार्ड नोंदणी व नावाचा समावेश करून सुविधा आॅनलाईन करण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे. राज्यात या सुविधेचा प्रारंभ मुंबईत रेशनकार्ड आॅनलाईन वितरित करून करण्यात येणार आहेत.
राज्यात सध्या २ कोटी ४८ हजार रेशन कार्डधारक आहेत. त्यांना ५३ हजार शिधा वाटप दुकानांतून धान्याचे वितरण केले जाते. तसेच १ कोटी ४८ लाख कार्डधारकांना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेचा लाभ दिला जातो. राज्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचप्रमाणात रेशनकार्ड मागणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. अर्ज करण्यापासून ते रेशनकार्ड मिळेपर्यंत मोठा अवधी लागत असल्याने आता रेशनकार्ड नोंदणी व नाव समावेशाची सुविधा आॅनलाईन करण्यात येणार आहे.
ग्राहकांना जलद सुविधा देण्यासाठी पुरवठा विभागाचे सर्व कामकाज आॅनलाईन करण्याचा निर्णय ना. गिरीश बापट यांनी घेतला आहे. या विभागासंबंधी गोदाम आणि पुरवठा यंत्रणेची कामे यापूर्वीच आॅनलाईन करण्यात आली आहेत. आॅनलाईन रेशनकार्ड नोंदणीमुळे बोगस शिधापत्रिकाधारकांना आळा बसणार आहे. तसेच शिधानियंत्रक कार्यालयाचा ताणदेखील कमी होणार आहे. (प्रतिनिधी)

नवीन नावांचा समावेश ‘आॅनलाईन’ पद्धतीने
आॅनलाईन सुविधेसाठी पुरवठा विभागाने रेशनकार्ड मॅनेजमेंट सिस्टीम (आरसीएमएस) नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या विभागाच्या संकेतस्थळावरुन एक लिंक ओपन केल्यानंतर नवीन रेशनकार्डसाठी नमूना उपलब्ध होईल व रेशनकार्डमध्ये नवीन नावांचा समावेश देखील याच पद्धतीने करता येणार आहे.

Web Title: -Only get ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.