एकालाच पाच रेशन दुकाने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:02 PM2018-03-20T22:02:22+5:302018-03-20T22:02:22+5:30

बडनेरातील जुनीवस्तीत एकाच माणसाला आजवर पाच सरकारी स्वस्त धान्य दुकाने देण्यात आली आहेत. या दुकान मालकाकडून गोरगरीब जनतेच्या लुटीचे वाभाडे भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांच्या कक्षात काढले.

Only one of the five ration shops? | एकालाच पाच रेशन दुकाने?

एकालाच पाच रेशन दुकाने?

Next
ठळक मुद्देडीएसओंना सवाल : आठ दिवसांचा अल्टिमेटम

आॅनलाईन लोकमत
अमरावती : बडनेरातील जुनीवस्तीत एकाच माणसाला आजवर पाच सरकारी स्वस्त धान्य दुकाने देण्यात आली आहेत. या दुकान मालकाकडून गोरगरीब जनतेच्या लुटीचे वाभाडे भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांच्या कक्षात काढले.
भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व जुनीवस्तीच्या नगरसेविका गंगा अंभोरे मंगळवारी तक्रारींचा खच घेऊन दुपारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात धडकले. जुनीवस्तीत कागदोपत्री दोन दुकाने वेगळी दाखवली आहेत. प्रत्यक्षात ती अस्तित्वातच नाहीत. गरजू लाभार्थींना धान्य मिळत नाही. लोकांच्या एकाही तक्रारीचा निपटारा केलेला नाही. लोकांच्या तक्रारींचा लिखित गठ्ठा घेऊन शिवराय कुळकर्णी यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. दुकानमालक अनिल वनवे यांना कधी कारवाईचे पत्रही न दिल्याच्या मुद्द्यावर कार्यालयीन अधिकारी सोळंके निरुत्तर झाल्या. लाभार्थी यादीत घोळ आहे. अंत्योदय व अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समाविष्ट लोकांना लाभ मिळत नसल्याने शिवराय कुळकर्णी यांनी संताप व्यक्त केला. आठ दिवसांत घोळ संपवा, असा इशारा शिवराय कुळकर्णी यांनी दिला. याप्रकरणी याद्यांची तपासणी, दुकान पाहणी व तक्रारींचा निपटारा सात दिवसांत करू, असे टाकसाळे म्हणाले.

Web Title: Only one of the five ration shops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.