अवघ्या १ रूपयांत लावून देणार लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:01 PM2017-09-25T23:01:08+5:302017-09-25T23:01:39+5:30
निक सर्वशाखीय माळी महासंघाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे आयोजन ९ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक सर्वशाखीय माळी महासंघाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे आयोजन ९ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. या परिचय मेळाव्याच्या अनुषंगाने अवघ्या १ रूपयांत लग्न लावून देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आगळ्या उपक्रमासाठी नि:शुल्क नोंदणी सुरू आहे.
या महामेळाव्यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा, राजस्थान आदी प्रांतातील गासे, फुल, भौरे, मरार, सैनी, लोणारी, झाडपी, वनमाळीसह अन्य शाखा-उपशाखांमधील पाच हजारांचे वर माळी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सर्व जातीय व सर्वधर्मियांचे विवाह नाममात्र १ रूपयां शुल्कात लावून दिले जातील. यासाठी संघाचे श्रीकृष्ण बनसोड, एन.आर.होले, साहेबराव निमकर, मधुकर आखरे, वसंतराव भडके, डी.एस.यावतकर, गोविंद फसाटे, गणेश खारकर, बबनराव पाटील, नितीन खेरडे, प्रवीण ढवळे, ओमप्रकाश अंबाडकर, राजेंद्र वाढोकार, नाना मालधुरे, भरत खासबागे आदी प्रयत्नरत आहे.