दहापैकी सात अमरावतीकरांनाच बायकोचा मोबाईल क्रमांक पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:47+5:302021-07-11T04:10:47+5:30

अमरावती : एकविसाव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीचा उच्चांक गाठला. या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. एखादा ...

Only seven out of ten Amravati residents send their wife's mobile number | दहापैकी सात अमरावतीकरांनाच बायकोचा मोबाईल क्रमांक पाठ

दहापैकी सात अमरावतीकरांनाच बायकोचा मोबाईल क्रमांक पाठ

Next

अमरावती : एकविसाव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीचा उच्चांक गाठला. या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. एखादा माणूस जिथे कुठे असेल, तेथे शेतात, जंगलात, कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र रस्त्यावर त्याच्याशी सहजतेने संपर्क साधता यावा, या जिज्ञासेतून माणसाने भ्रमणध्वनीचा शोध लावला आणि मोबाईल क्रांती घडून आली. मात्र, त्यामुळे स्मरणशक्तीवर ताण कमी झाला आहे. टचपॅडवर बोट लावताच सर्व काही येत असल्याने बायकोचा मोबाईल क्रमांकही दहापैकी सात अमरावतीकरांना पाठ नसल्याचे दिसून आले.

मोबाईल आज सर्वांचीच गरज झाली आहे. प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. मात्र, मोबाईलमुळे स्मरणशक्तीचा वापर कमी झाला असून, माणूस परावलंबी झाला आहे. कुणाचाही नंबर वारंवार डायल करण्याऐवजी मोबाईलमध्ये तो सेव्ह करण्याची व्यवस्था आहे. केवळ तो सर्च करावा लागत असल्याने आठवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे पाहायला मिळत आहे. ‘लोकमत’ने राजकमल चौक, राजापेठसह प्रमुख चौकांमध्ये प्रत्येकी दहा जणांच्या घोळक्यात पत्नीचा मोबाईल क्रमांक किती जणांना पाठ आहे, याबाबत विचारणा केली. सात जणांनाच मोबाईल नंबर पाठ असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले. विसराळूंना त्यांच्या प्रिय पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे पहिले सहा क्रमांकदेखील आठवत नव्हते.

बाॅक्स

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

महापालिका शाळेतील एका शिक्षकाला बायकोचा नंबर लक्षात नव्हता. मात्र, पूर्वी स्वत: वापरत असलेले सिम कार्ड मुलाला दिल्याने तो क्रमांक बरोबर आठवत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या नंबरवर दरमहा रिचार्ज करावा लागत असल्याने तो क्रमांकही आपसूकच पाठ झाला आहे.

-----------

यामुळे क्रमांक पाठ

काही जणांना पत्नीसह मुलगा आणि मुलीचा नंबर मुखपाठ होता. मात्र, त्यातही गोम होती. विसरभोळा स्वभाव असल्याने अनेकदा मोबाईल घरीच राहून जातो. अशावेळी संपर्क साधण्यात अडचण येऊ नये म्हणून कुटुंबातील पत्नी, मुलाचा नंबर पाठ केल्याचे एका महसूल कर्मचाऱ्याने सांगितले.

बाॅक्स

‘पाठ करण्याची गरजच काय?’

‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत १० जणांना मोबाईल नंबर पाठ आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यातील सात जणांनी नंबर मुखपाठ असल्याची कबुली दिली. एक-दोघांनी तो डायल करून पडताळून पाहा, येथपर्यंत आत्मविश्वास दाखविला. उर्वरित व्यक्तींनी पत्नीचा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह असल्याने पाठ असण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

------------------

पोरांना आठवतो, मोठ्यांना का नाही?

लहान मुले आई-वडील यांनाच अधिक कॉल करतात. एखाद्या वेळेला आपल्या मित्र अथवा मैत्रिणीला कॉल करण्याचा प्रसंग ओढवतो. त्यामुळे लहान मुलांना आई-बाबांचे नंबर पाठ असतात. मोठ्या लोकांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने त्यांना मोबाईल क्रमांक लक्षात राहत नाहीत.

- आशिष साबू, मानसोपचार तज्ञ्ज

------------

कोट

बायकांनाही नवऱ्याचा नंबर नाही पाठ

मोबाईलमध्ये पतीदेवाचा नंबर सेव्ह केला आहे. त्यामुळे पाठ करण्याची गरजच पडली नाही. टोपणनावाने सेव्ह केला असल्याने सर्च करताच नंबर येतो. मात्र, नंबर मुखोद्गत नाही.

- गृहिणी,

पूर्वी मोबाईल नंबर पाठ होता. मात्र, आता नंबर सेव्ह असल्याने, शिवाय पतीदेवासोबत दररोजच बोलणे असल्याने रिसेंट कॉल लिस्टमध्ये तो दिसतो. त्यामुळे नंबर पाठ करण्याची गरज पडली नाही. केवळ अखेरचे दोन आकडे पाठ आहेत.

- गृहिणी, अमरावती.

कोट

मुलांना आई-बाबांचा नंबर पाठ

लहान असतानाच मोबाइल नंबर पाठ करण्याची सवय पडली. त्यामुळे बाबांचाच नव्हे तर, कुटुंबातील सर्वांचाच नंबर मुखपाठ आहे. दूरध्वनीवरून नेहमीच नंबर डायल करावा लागत असल्याने केव्हाही विचारला तर सहज सांगता येतो.

- मुलगा.

Web Title: Only seven out of ten Amravati residents send their wife's mobile number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.