कौंडण्यपूर अस्थिघाटावर तीन व्यक्तींनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:50+5:302021-04-18T04:11:50+5:30

कुऱ्हा : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने ...

Only three persons are allowed on the Kondanyapur ossuary | कौंडण्यपूर अस्थिघाटावर तीन व्यक्तींनाच परवानगी

कौंडण्यपूर अस्थिघाटावर तीन व्यक्तींनाच परवानगी

Next

कुऱ्हा : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने धार्मिक स्थळे व पूजाविधी बंद करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिघाटावर अस्थी पूजनासाठी व अन्य विधीसाठी केवळ तीनच व्यक्तींना ग्रामपंचायतमार्फत परवानगी देण्यात येणार आहे.

अस्थिघाटावर पूजाविधी व अस्थी विर्सजन करण्यासाठी दूरदुरून नागरिक येतात. अनेकदा कोरोना रुग्णांच्या अस्थीसुद्धा आणल्या जातात. अस्थिघाटावर नागरिकांची गर्दीदेखील वाढतीच आहे. याच पार्श्वभूमीवर १६ एप्रिल रोजी कौडण्यपूर ग्रामपंचायतचे सचिव पी.पी. पाचघरे व कुऱ्हा येथील ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग्रामप्रशासनामार्फत पुढील दोन दिवस कठोर नियमावली जारी करण्यात आली. त्यानुसार कौंडण्यपूर अस्थिघाटावर फक्त तीन व्यक्तींना अस्थी पूजनासाठी किंवा धार्मिक विधीसाठी परवानगी देण्यात येणार आहे तसेच पुढील २ दिवस नागरिकांनी जर या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई व अस्थिघाट पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Only three persons are allowed on the Kondanyapur ossuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.