अंबानगरीत पायरेटेड सीडींची खुुलेआम विक्री

By admin | Published: September 19, 2016 12:19 AM2016-09-19T00:19:33+5:302016-09-19T00:19:33+5:30

अंबानगरीत अनेक दिवसांपासून खुलेआम पायरेटड सीडीची विक्री सुरू आहे.

Open-ended pirated CDs | अंबानगरीत पायरेटेड सीडींची खुुलेआम विक्री

अंबानगरीत पायरेटेड सीडींची खुुलेआम विक्री

Next

पोलिसांचे दुर्लक्ष : ३० रुपयांत मिळते नवीन चित्रपटांची सीडी
संदीप मानकर अमरावती
अंबानगरीत अनेक दिवसांपासून खुलेआम पायरेटड सीडीची विक्री सुरू आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असून कुठलाही नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यास दुसऱ्याच दिवशी ग्राहकांना शहारात ती सीडी उपलब्ध होते.
कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार चित्रपटाची या बनावट सीडी खुल्या बाजारात विकणे गुन्हा ठरते. परंतु काही तस्करही सीडी पायरेटेड करून लाखोंचा गौरखधंदा करीत आहे.
येथील हॉटेल रामगिरीच्या समोर दीप सीडीचे दुकान आहे. येथे अशा प्रकाराच्या सीडीज विकत घेण्यासाठी नागरिकांची रीघ लागते. त्यामुळे याला आळा कोण घालणार, असा प्रश्न पडत आहे. मल्टिमीडियाचा जमाना असल्यामुळे क्षणात आता कुठलीही गोष्ट उपलब्ध होते. यू-ट्युबवर पाहिजे तो चित्रपट पहायला मिळतो. पण जोपर्यंत कुठल्याही नवीन चित्रपटाचा दिगदर्शक ही सीडी खुल्या बाजारात विकण्याची परवानगी देत नाही, तो पर्यंत कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार याला विक्री करता येत नाही. परंतु शहरात पोलिसांचे व सीडी विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळे हा व्यवसाय फोफावला आहे. २० ते ३० रुपयांत घरबसल्या नागरिकांना सीडीवरून कुठलाही चित्रपट पाहता येत असल्यामुळे याचा परिणाम चित्रपटगृहाच्या ग्राहकांवरही झाला आहे. पायरेटेड सीडी शहरात खुलेआम विक्री होत असताना पोलिस गप्प का असा प्रश्नही समोर येत आहे. या सीडीच्या व्यवसायातून रोज शहरात लाखो रुपयांचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे अश्या सीडीज सेंटरवर कारवाई होणे अपेक्षित आहेत.

बनावट सीडीचे मोठे रॅकेट
बनावट सीडीज अमरावतीत मुंबईहून दाखल होत असल्याची महिती आहे. या सीडी विक्रीचे अमरावतीत मोठे रॅकेट असून, राजकमल चौक, रेल्वेस्टेश्न चौक गांधी चौक व शहरातील अनेक भागात या बनावट सीडी खुलेआम विक्री करण्यात येत आहे. कुठलाही नविन चित्रपट रीलीज झाला की अशा सीडीज सहज उपलब्ध होतात. ग्राहकही त्याला खरेदी करण्यासाठी पसंती दर्शवितात.

बनावट सीडी विकणे गुन्हा
कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार पायरेटेड बनावट सीडीज विकणे गुन्हा आहे. पण या कायद्याची अंबानगरित सर्रास पायमल्ली केली जात आहे. पोलिसांच्या आशीर्वादामुळेच या अवैध सीडीज अमरावतीत सर्रास विकल्या जातात. या सीडीजमध्ये ब्ल्यू फिल्मसच्या सीडीही विक्री करण्यात येत आहेत. हा प्रकार रोखणे गरजेचे आहे.
'टॉरेन्ट सॉफ्टेवेअर'ने केली
जाते 'डाऊनलोडिंग'
एखाद्या चित्रपटातील पहिल्याच 'शो'मधून अत्याधुनिक कॅमेऱ्याने चित्रपटाचे चित्रीकरण केले जाते. लगेच संगणकाच्या माध्यमातून 'टोरेन्ट सॉफ्टेअर'च्या माध्यमातून याच्या हजारो पायरेटेड सीडीज 'डाऊनलोटड' केल्या जातात व यातून कोट्यवधी रुपयांच्या गौरखधंदा राज्यभर सुरू असल्याचे चित्र आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात महिन्याकाठी या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. हा प्रकार बंद करवा व अशा सेंटरवर पोलिसांनी धाडी टाकावी, अशी मागणी होत आहे.

पायरेटेड सीडीज खुल्या बाजारात विकणे हा कॉपीराईट अ‍ॅक्टनुसार गुन्हा आहे. अश्या सीडीज विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू असते. चित्रपटाच्या दिगदर्शकांनी तक्रार दिल्यास याचा मोठा गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण ती त्याची प्रोपरटीज असते.
- विशाल खलसे
सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Open-ended pirated CDs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.