वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 07:00 AM2022-05-14T07:00:00+5:302022-05-14T07:00:06+5:30

Amravati News यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'Operation Birbal-2' to curb wildlife smuggling | वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन

गणेश वासनिक

अमरावती : उन्हाळ्याच्या हंगामात वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट व इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडतात. मात्र, यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड कार्यरत आहे. देशात वाघ, बिबट व इतर अनुसूचीनिहाय वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डब्ल्यूसीसीबी वेळोवेळी गाईडलाईन तयार करते. ज्या राज्यात वाघ, बिबट्यांच्या शिकारी होण्याचे प्रमाण वाढीस लागते, अशा राज्यांवर सक्ती करण्याचे अधिकारसुद्धा डब्ल्यूसीसीबीला बहाल करण्यात आले आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीप्रकरणी चौकशीदेखील ही संस्था करू शकते. तथापि, गत दोन वर्षांत राज्यात वनविभागाची कामगिरी सुधारली आहे.

काय आहे ‘ऑपरेशन बिरबल-२’

उन्हाळ्यात वनक्षेत्रांना आगी लावून वन्यजीवांची हत्या, शिकार आणि अवयवांची तस्करी केली जाते, असा निष्कर्ष डब्ल्यूसीसीबीने काढला आहे. वन्यजीवांची तस्करी करणारे मास्टर माइंड सक्रिय होतात. त्यामुळे ‘ऑपरेशन बिरबल-२’नुसार गावपातळीवर स्वत: तपास करणे, शिकाऱ्यांवर पाळत ठेवणे, शिकाऱ्यांची गोपनीय माहिती मिळविणे, स्थानिकांची मदत घेत शिकाऱ्यांवर सापळा रचणे आदी कामे वनकर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.

वनतस्करांचे रेकॉर्ड तपासणार

वनपरिक्षेत्रनिहाय वन्यजीवांच्या शिकारप्रकरणी जुन्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, तो हल्ली नेमका काय करतो, याचा शोध घेणे, त्या गुन्हेगाराला कोणी बाहेरील व्यक्ती भेटते अथवा संपर्क आहे का? याविषयी चाचपणी करणे, जंगलात ती व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देणे, गुन्हेगारांविषयी बारीकसारीक माहिती गोळा करणे, गावस्तरावर पोलीस पाटलांची मदत घेणे, वन्यजीव शिकारीचे आर्टिकल्स तयार करून त्याचे गावस्तरावर मार्गदर्शन करणे आणि पूर्वाश्रमीच्या वनगुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

 

‘ऑपरेशन बिरबल-२’ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. वन्यजीवांच्या शिकारी यातून नक्कीच रोखता येईल. राज्यभर ही मोहीम राबवू. जंगल क्षेत्रानजीकच्या गावात बारकाईने लक्ष दिले जाईल.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र

Web Title: 'Operation Birbal-2' to curb wildlife smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.