पोलीस विभागाची आॅपरेशन स्माईल मोहीम

By admin | Published: January 2, 2016 08:33 AM2016-01-02T08:33:23+5:302016-01-02T08:33:23+5:30

पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांतर्गत १ ते ३१ जानेवारीदरम्यान आॅपरेशन स्माईल मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Operation Smile Campaign of the Police Department | पोलीस विभागाची आॅपरेशन स्माईल मोहीम

पोलीस विभागाची आॅपरेशन स्माईल मोहीम

Next

अमरावती : पोलीस आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांतर्गत १ ते ३१ जानेवारीदरम्यान आॅपरेशन स्माईल मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना योग्यस्थळी पाठविले जाणार आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून आश्रमगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालये, हॉटेल्स, दुकाने आदी ठिकाणी काम करणाऱ्या मुलांचा शोध पोलीस घेणार आहेत. त्या बालकांची चौकशी करून त्यामधील हरविलेल्या बालकांचा शोध पोलीस घेणार आहेत. या बालकांच्या संगोपनासाठी बालकल्याण समिती, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष व अशासकीय संस्था यांच्याशी समन्वय साधून केले जाणार आहे. या मोहिमेत शोधले गेलेल्या बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य पोलीस विभाग आॅपरेशन स्माईल-२ या मोहिमेतून करणार आहे.
मागील वर्षाच्या सुरुवातीला पोलीस विभागाने आॅपरेशन स्माईल १ मोहिम सुरु केली होती. त्यावेळी शेकडो बालकांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Operation Smile Campaign of the Police Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.