संत्रा गळती, शंखीचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:00 AM2020-08-10T05:00:00+5:302020-08-10T05:01:26+5:30
दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात होत असलेली संत्रा गळती, शंख किड्यांच्या प्रादुभार्वामुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कृषी अधिकारी व तलाठी यांच्यासोबत वणी बेलखेडा येथील शिवारात प्रत्यक्ष पाहणी केली.
दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील शेतकरी मागणी करीत होते. यात यावर्षी शंख गोगलगायनेसुद्धा कहर माजविला होता. यांच्यामुळे राज्यमंत्री बचू कडू यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.
तसेच या नुकसान वर तात्काळ उपाययोजना करून व दोन्ही बाबतीत सर्वे करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी तसेच शेतकरी व कृषी अधिकारी यांच्यात कमिटी तयार करून लवकरच या प्रश्नावर तोडगा काढावा असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी सातपुते तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, तलाठी मातकर सह प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख, प्रफुल्ल नावघरे, प्रदीप बंड, सुनील मोहोड, अमोल शेळके मंगेश शेळके व वणी बेलखेडा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.