परप्रांतीय बाजारपेठेत संत्राला मिळतो मातीमोल भाव ! संत्राउत्पादक चिंताग्रस्त !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:23+5:302020-12-03T04:23:23+5:30
वरुड (संजय खासबागे ) :- विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याची ख्याती आहे . देशविदेशात संत्राची चव चाखल्या जाते . ...
वरुड (संजय खासबागे ) :- विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याची ख्याती आहे . देशविदेशात संत्राची चव चाखल्या जाते . २० हजार हेक्टरवर संत्राचे पीक घेतल्या जात असून यावर्षी आंबिया भाराच्या संत्राचे उत्पादन चांगले असले तरी मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापार्यानाही नुकसान सहन करण्याची वेळ आली . आंबिया बहाराच्या संत्राला गत महिन्यापासून मातीमोल भाव मिळत आहे . यामध्ये अडीचशे ते पाचशे रुपये कॅरेट आणि १० ते १५ रुपये किलो नुसार दर मिळत असल्याने बाजारपेठेत पोहचविण्याचा आणि उत्पादन खर्च काढणे दुरापात्र झाले आहे . यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यामध्ये चिंतेचे सावंट पसरले असून ४० टक्के संत्रा झाडावरच आहे .
विदर्भाच्या कॅलिफोर्निया वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे . वरुड तालुक्यात २० हजार हेक्टरवर संत्राचे पीक घेतल्या जाते . संत्राचे दोन वेळा उत्पादन शेतकरी काढतात . यामध्ये आंबिया बहार आणि दुसरा मृग बहार घेतल्या जातो .गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वातावरण चांगले असल्याने आंबिया भारताची फूट समाधानकारक राहिली . यामुळे आंबिया बहाराची संत्रावर पंजाबच्या किन्नू ने मात केली असून बाजारपेठेत संत्राला भाव मिळत नाही . दिल्ली , झारखंड , उत्तरप्रदेश , केरळ मध्ये संत्राचे भाव पडले असल्याची ओरड असली तरी वैदर्भीय संत्राला मातीमोल भाव मिळत असून आंदोलने , कोरोना प्रादुर्भाव याचा सुद्धा फाटक पडत आहे . बांग्लादेशात सुद्धा संत्राची परवड होत आहे . २५० ते ५५० रुपयांपर्यंत एक कॅरेट संत्रा विकल्या जाते . यामध्ये तोडाई , भराइ , माल वाहतूक बाजार पेठेपर्यंतचा कॅरेट सह खर्च २५० रुपये येतो . कॅरेट प्रमाणे २५० ते ५०० रुपयांपर्यंत आणि बाजारात १० ते १५ रुपये किलोपर्यंत संत्राला भाव मिळत आहे . यामुले संत्रा उत्पादक मेटाकुटीस आला आहे तर शेतात अजूनही ४० टक्के संत्रा झाडावरच आहे . नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याची वेळ असते . मात्र अद्यापही संत्रा झाडावरच असल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापाऱयांना सुद्धा आर्थिक फटका बसत आहे . यामुळे शेतकर्याना परप्रांतीय बाजार पेठेत महाराष्ट्र पणन महामंडळाचे कार्यालय उघडणे आवश्यक आहे . संत्राचे भाव खालावल्याने संत्रा उत्पादक शेतकर्याना थेट मार्केटिंगची सुविधा होणे गरजेचे असल्याचे शेतकऱयांतून सांगितल्या जाते .
* संत्राला भाव नसल्याने शेतकऱ्याला फटका बसत आहे - विजय श्रीराव शेतकरी
शासनाने शेतकर्याकरिता किसान रेल सुरु केली मात्र आठवड्यातून एकवेळाचं येते तर यावर्षी संत्राचे पीक चांगले असून दिल्ली बाजारात भाव नसून किन्नूला अधिक पसंती मिळत असून भाव सुद्धा चांगले मिळतात . यामुळे याचा परिणाम संत्रावर झाला आहे . भाव नसल्याने संत्रा शेतातच पडून आहे . या वेळी नोव्हेंबरमध्ये आंबिया बहाराचे उत्पादन घेण्याकरिता पाणी सोडावे लागत असताना संत्रा झाडावरच असल्याने पाणी सोडता येत नाही . यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे असे पुसला येथील शेतकरी विजय श्रीराव यांनी सांगितले .