पालकमंत्र्यांनी दिले अवैध दारू पुरवठादारावर कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 10:44 PM2018-02-12T22:44:16+5:302018-02-12T22:44:53+5:30

यशस्विनी अभियानाच्या मुख्य समन्वयक सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वातील महिलांनी सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निदर्शनास परवानधारक दारू दुकानातूृन अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची बाब आणून दिली.

Order of action on illegal liquor suppliers by Guardian Minister | पालकमंत्र्यांनी दिले अवैध दारू पुरवठादारावर कारवाईचे आदेश

पालकमंत्र्यांनी दिले अवैध दारू पुरवठादारावर कारवाईचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देयशस्विनी अभियानाचे निवेदन : सुरेखा ठाकरे यांच्या मागणीची दखल

आॅनलाईन लोकमत
अमरावती : यशस्विनी अभियानाच्या मुख्य समन्वयक सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वातील महिलांनी सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निदर्शनास परवानधारक दारू दुकानातूृन अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची बाब आणून दिली. याची पालकमंत्र्यांनी त्वरीत दखल घेत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सोनोने यांना कारवाईचे निर्देश दिले.
सध्या नैसर्गिक व सुलतानी संकटाचा सामना नागरिक करीत आहे. अशा अवस्थेत अवैध दारूचा पूर ग्रामीण भागात वाहत असल्याने याची महिलांना झळ सहन करावी लागत आहे. परिवातील कर्ता पुरुष जर दारूच्या आहारी गेला असेल तर त्या परिवाराचा संपूर्ण भार त्या घरातील महिलेवर येऊन तिला घर सांभाळणे कठीण जाते. आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा पुरवठा होत आहे. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सुरेखा ठाकरे यांनी केला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा समन्वयक कल्पना बुरंगे, आशा गोटे, सुषमा बर्वे, वंदना पडोळे, सारिका बोरकर, सरला इंगळे, शुभांगी ठाकरे, श्वेता शेरेकर, प्रिती काकडे, हर्षा ढोक, संगीता साबळे, विद्या मोहोड, विजया बोदडे, रंजना पाटील आदी उपस्थित होत्या.

हा प्रकार बंद करणे आवश्यकच
ग्रामीण भागात तालुकास्तरावरील परवानाधारक दारू दुकानदाराकडून अवैध दारू पुरवठा केला जात आहे. हा प्रकार चांदूर बाजार तालुक्यासह इतरही ठिकाणी सुरू आहे. परिणामी गावातच मद्य मिळत असल्याने परिवारातील कर्ता पुरूष जर दारूच्या आहारी गेला, तर कुटुंबाचा सर्व भार गृहिणी महिलेवर येतो. त्यामुळे घर सांभाळणे कठीण जाते. याला पायबंद घालणे गरजेचे असल्याचे सुरेखा ठाकरे म्हणाल्या.

Web Title: Order of action on illegal liquor suppliers by Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.