कृषी विभागाला तक्रारी स्वीकारण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:26 PM2017-11-25T23:26:36+5:302017-11-25T23:33:22+5:30
राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : राज्यात सगळीकडे कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळी आल्याने पीक नष्ट झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदने, मोर्चाद्वारे शासनाचे या नुकसानाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे शेतकºयांकडून लेखी तक्रारी विहित नमुन्यात स्वीकाराव्यात, असे शासनाचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.
विहित नमुन्यात जाचक अटी नमूद असून, त्या अर्जावर वरिष्ठ बीज नियंत्रकाकडून पडताळणी झाल्यावरच शेतकºयांना मदत मिळेल. परंतु, या जाचक अटी व वरिष्ठांच्या अहवालानुसार बहुतांशी शेतकरी या बोंड अळीच्या नुकसानापासून वंचित राहू शकतात, अशी चर्चा शेतकºयांमध्ये झडत आहे.
चांदूररेल्वे तालुक्यात ७ हजार ९६८ हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. महसूल विभागाच्या पाहणी अहवालानुसार बोंड अळीबाबत सरसकट मदत मिळणे शासनाकडून अपेक्षित होते. परंतु, शासनाकडून शेतकºयांना द्यावयाची मदतीची क्रूर थट्टाच नेहमीच होत आली आहे. कृषी विभागाकडे विहित नमुन्यात लेखी तक्रार दाखल करणाºयांचीच चौकशी केली जाईल. जे शेतकरी अर्ज दाखल करणार नाहीत, त्यांची चौकशी कृषी विभागाकडून होणार नाही.
सध्या बोंड अळीमुळे व कीटकनाशक फवारणीची क्षमता नसल्याने बहुतांश शेतकरी उभ्या हिरव्या पºहाटीत ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट करीत असल्याच्या घटना दररोज घडत आहे. याबाबत शासनाने सरसकट मदतीची घोषणा केली असती, तर शेतकºयांना दिलासा मिळाला असता, अशी शेतकरी वर्गाची सर्व बाजूंकडून मागणी होत आहे.