जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बांधकाम यंत्रणांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:59 PM2019-09-16T23:59:15+5:302019-09-16T23:59:35+5:30

शहरातील वर्दळीच्या मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, पावसाने ठिकठिकाणी डबके साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये कॅम्प ते पंचवटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

The order of the collectors was lost on the construction machinery | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बांधकाम यंत्रणांचा खो

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बांधकाम यंत्रणांचा खो

Next
ठळक मुद्देअल्टिमेटम् संपला : कारवाई केव्हा?, खड्डे उठले नागरिकांच्या जीवावर


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गणेशोत्सवादरम्यान अनुचित घटना टाळण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांची ३१ ऑगस्टपर्यंत डागडुजी करण्याचे आदेश दिले होते. या अलटीमेटमला २२ दिवस झालेत.मात्र, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती आहे. यामुळे रोज अपघात होत आहेत. परिणामी या विभागांवर जिल्हाधिकारी कारवाई करतील का, असा सवाल अमरावतीकरांनी उपस्थित केला आहे.
शहरातील वर्दळीच्या मार्गांवर मोठ-मोठे खड्डे पडले असून, पावसाने ठिकठिकाणी डबके साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनावरील नियंत्रण बिघडून अपघाताच्या घटना रोज घडत आहेत. यामध्ये कॅम्प ते पंचवटी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या वर्दळीच्या मार्गावर स्कूल बसेस, आॅटो, एसटी व जडवाहने धावतात. नजरचुकीने खड्ड्यातून वाहन गेल्यास नियंत्रण बिघडून भीषण अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच राजापेठ उड्डाणपुलालगत कुथे हॉस्पिटलजवळ जीवघेणा खड्डा पडला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. ब्रिटिशकालीन राजकमलस्थित उड्डाणपुलावरदेखील खड्डे पडले असून अपघातास निमंत्रण देत आहे. निंभोरा स्थित एक हजार मुलांचे मागासवर्गीय वसतिगृहानजीकच्या रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना खड्ड्यातून सायकली, दुचाकी काढताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका क्षेत्रातील वर्दळीच्या रस्त्यांची प्रचंड दैना झाली आहे. काही भागांत रस्ता सिमेंटीकरणाची कामे सुरू असल्याने वनवेमधून मार्ग काढावा लागत असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी संबंधित विभागांना मुख्य रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

Web Title: The order of the collectors was lost on the construction machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.