५२६ धोकादायक वर्गखोल्या निर्लेखित करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:33+5:302021-07-29T04:13:33+5:30
अमरावती: जिल्हा परिषद शाळांतील धोकादायक व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या तातडीने निर्लेखित करण्याचे आदेश मुख्यकार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्राथमिक ...
अमरावती: जिल्हा परिषद शाळांतील धोकादायक व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या तातडीने निर्लेखित करण्याचे आदेश मुख्यकार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील २७२ शाळांमधील ५२६ वर्गखोल्याचे तातडीने निर्लेखित करण्याची कारवाई शाळांनी करावी, अशा लेखी सूचना १४ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत २७ जुलै रोजी दिले आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी जिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या व इमारती तत्काळ निर्लेखित करण्याचे निर्देश झेडपीचे सीईओंना दिले. त्यानुसार सीईओंनी जिल्हाभरातील धोकादायक वर्गखोल्या व इमारती पावसामुळे पडण्याची दाट शक्यता असून त्यामुळे जीवितास धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता १४ तालुक्यातील यू-डायस प्लस २०१९-२० नुसार जिल्हा परिषदेच्या २७२ शाळेतील ५२६ वर्गखोल्या शिकस्त असल्याचे दिसून येत आहे. त्या वर्गखोल्यांचे निर्लेखित करावे, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत.
बॉक़्स
विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा
जिल्हा परिषद शाळेतील धोकादायक वर्गखोल्या किंवा इमारतीत विद्यार्थ्यांना आाध्यापनाकरिता बसविण्यात येऊ नये, पयार्यी व्यवस्था करावी, अशा सूचना सीईओ अविश्यांत पंडा यांनी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
बॉक्स
तालुकानिहाय शाळा वर्गखोल्यांची संख्या
अचलपूर २७ ४५
अमरावती १९ ३१
अंजनगाव सुर्जी १४ २८
भातकुुली २६ ४९
चांदूर बाजार २२ ४०
चिखलदरा २५ ४३
चांदूर रेल्वे ०८ १५
दर्यापूर २० ४३
धारणी २३ ३५
धामनगांव रेल्वे १२ १९
मोर्शी २५ ७०
नांदगाव खंडेश्र्वर ०९ २१
तिवसा १६ ३६
वरूड २६ ५१
कोट
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिकस्त व धोकादायक असलेल्या वर्गखोल्याचे निर्लेखित करण्याबाबत सीईओंनी सूचना दिल्या होत्या.त्यानुसार संबंधित शाळांना कारवाई करण्याबाबत लेखी पत्राव्दारे गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत सूचना दिलेल्या आहेत.
- ई.झेड. खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक