निकषांनुसार घोषित प्रगत शाळा पडताळणीचे आदेश

By admin | Published: April 11, 2016 12:18 AM2016-04-11T00:18:31+5:302016-04-11T00:18:31+5:30

प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Order for the declared Advanced School Verification Orders | निकषांनुसार घोषित प्रगत शाळा पडताळणीचे आदेश

निकषांनुसार घोषित प्रगत शाळा पडताळणीचे आदेश

Next

निर्णय : शिक्षण सचिवांचे जिल्हा परिषदेला पत्र
अमरावती : प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत दरमहा प्रक्रिया अहवाल मागविण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून निकषानुसार घोषित करण्यात आलेल्या प्रगत शाळांची पडताळणी करण्याच्या सूचना राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सर्व जिल्हा परिषद महापालिकांना एका पत्रकाद्वारे ४ एप्रिल रोजी दिल्या आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी व त्याबाबत विविध प्रकारची माहिती शासनस्तरावर मागविली जाते. त्यामधून सर्वच जिल्ह्यांत डिजिटल शाळा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यामध्ये शिक्षक व पर्यवेक्षक जोमाने कार्य करीत असून त्याची परिणती शाळा प्रगत होण्यात होत आहे. प्रगत शाळा निश्चित करण्याबाबत शिक्षण आयुक्त यांनी प्रगत शाळांसाठी २५ निकष निश्चित केले आहेत. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात या निकषानुसार ८० टक्के गुण आणि ५ व ६ एप्रिल २०१६ रोजी होणाऱ्या संकलित चाचणी २ मूल्यमापन चाचणीमध्ये प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ४० टक्के गुण प्राप्त झालेल्या शाळांना प्रगत म्हणून घोषित करण्यात येणार आहे. यावर आधारितच शिक्षणाकारी यांचे गोपनीय अभिलेख लिहिले जाणार आहेत.
वरील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या प्रगत शाळांची आपल्या स्तरावरून शस्त्रक्रिया करून त्या शाळांची अंतिम माहिती शिक्षण विभागाने नेमून दिलेल्या संकेतस्थळावर शिक्षणधिकारी यांनी स्वत: प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्याशी विचार विनिमय करून १५ एप्रिलपर्यंत भरावी, अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत. सदरची माहिती अहवालाशी सुसंगत असावी तसेच प्रगत शाळांबाबत गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत चर्चा करावी लागणार आहे. प्रगत शाळांना विद्या परिषद पुणे येथील संबंधित अधिकारी भेटी देणार आहेत. त्यासाठी १९ एप्रिलपर्यंत नियोजन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
काय आहे भेटीचा उद्देश ?
प्रगत शाळांना भेटीत दिलेल्या माहितीची पडताळणी व केलेल्या कामाबद्दल विचारविनिमय व विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी भेटीचे नियोजन केले आहे. या भेटीचे नियोजन जिल्हास्तरीय स्वरुपाचे राहणार आहे. प्रगत शाळांना विद्या परिषदेच्या नियोजनानुसार २२ ते २७ एप्रिल या कालावधीत भेटी देतील. ही भेट शिक्षकांच्या स्वशिक्षणासाठी व समृद्धीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यानंतर प्रगत शाळांची निकषानुसार पडताळणी करुन त्याची माहिती त्याच दिवशी संकेत स्थळावर भरावी लागेल व त्यानंतर विद्या परिषद ३० एप्रिल रोजी प्रगत शाळा घोषित करणार आहेत.

Web Title: Order for the declared Advanced School Verification Orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.