जंगल सफारी सुरू करण्याचे आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:22+5:302021-07-29T04:13:22+5:30
(फोटो कॅप्शन चिखलदरा येथील जंगल सफारीसाठी चिखलदरा : पर्यटन स्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने परवानगी देण्यात ...
(फोटो कॅप्शन चिखलदरा येथील जंगल सफारीसाठी
चिखलदरा : पर्यटन स्थळावरील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जंगल सफारीला व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने परवानगी देण्यात आली असून, यासंदर्भात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी पत्र दिले होते. याप्रकरणी त्यांनी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळस्थळाचे पर्यटकांना दर्शन घडावे म्हणून जंगल सफारीचे आयोजन व्याघ्र प्रकल्यामार्फत सुरु करण्यात आल्याचे पत्रात नमूद केले होते. परंतु, कोरोना कालावधीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे चिखलदरा पर्यटन क्षेत्रातील जंगल सफारी बंद असल्याने जंगल सफारीचे संचालन करणाऱ्या गाईड व वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली. यामुळे सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये पर्यटकांसाठी चिखलदरा पर्यटनस्थळ खुले करण्यात आलेले असून पर्यटक मोठ्या प्रमाणात चिखलदरा येथे भेट देत असल्याने जंगल सफारी पुन्हा सुरू करण्याबाबत उपाययोजना करून आदेश जारी करण्याबाबतचे विनंतीपत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहे.