नागपूर महामार्गावरील ‘चाणक्य’च्या जप्तीचे आदेश
By admin | Published: November 20, 2015 01:05 AM2015-11-20T01:05:01+5:302015-11-20T01:05:01+5:30
नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाटगाव परिसरातील ‘हॉटेल चाणक्य’च्या जप्तीचे आदेश गुरुवारी आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्तांचा निर्णय : विनापरवानगी बांधकाम, नोटीसला उत्तर नाही
अमरावती : नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील रहाटगाव परिसरातील ‘हॉटेल चाणक्य’च्या जप्तीचे आदेश गुरुवारी आयुक्तांनी दिले आहेत. जप्तीची कारवाई शनिवारी केली जाणार असून सव्वा सहा लाख रुपये वसूल केले जाणार आहेत.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार झोन क्र.१ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांना हॉटेल चाणक्यवर जप्तीची कारवाई करावी लागणार आहे. या हॉटेलच्या मालकाने कोणतीही परवनागी न घेता बांधकाम केले होते. सुमारे ७८०० चौ. फूट अवैध बांधकामाप्रकरणी ६ लाख २५ हजार रुपये दंड वसूल करण्यासाठी कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार हॉटेलच्या मालकाला नोटीस बजावून ही रक्कम भरण्याबाबत कळविले होते. मात्र, दंडाची रक्कम मोठी असल्याने तो न भरण्याची भूमिका हॉटेल मालकाने घेतली होती. त्यामुळे आता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.