राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना ‘अनलॉक’चे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:45+5:302021-06-25T04:11:45+5:30
अमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्प ‘अनलॉक’ होणार आहे. त्यामुळे गत दीड वर्षापासून संरक्षित क्षेत्रात निसर्ग पर्यटन बंद होते. मात्र, ...
अमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्प ‘अनलॉक’ होणार आहे. त्यामुळे गत दीड वर्षापासून संरक्षित क्षेत्रात निसर्ग पर्यटन बंद होते. मात्र, आता २५ जूनपासून सुरू करण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाचा मार्ग सुकर झाला आहे. गत कही महिन्यांपासून पर्यटक, निसर्गप्रेमींना जंगल सफारीची प्रतीक्षा होती. तथापि, कोविड १९ च्या नियमांचे पालन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून ३० जूनपर्यंत व्याघ्र प्रकल्प ‘अनलॉक होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २५ जूनपासून निसर्ग पर्यटनास प्रारंभ होत आहे. पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग करणे, प्रकल्पात प्रवेशाच्यावेळी फूट ऑपरेटेड सॅनिटायझर तसेच हॅन्डवॉश करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या ठिकाणी पर्यटकांचा वारंवार संपर्क येताे, ते ठिकाणदेखील सॅनिटाइझ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिली आहे.