एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 03:55 PM2023-03-17T15:55:54+5:302023-03-17T16:00:07+5:30

जिल्हाभरातील कर्मचारी एकवटले

organizations hits the streets for 'old pension' scheme; Thousands of employees march on the collectorate office | एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’ 

एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’ 

googlenewsNext

गजानन मोहोड

अमरावती : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाचे लक्ष वेधले. सर्व शासकीय संघटनांच्या हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चाची ऐतिहासिक अशी नोंद झाली. मोर्चात महिलांचा सर्वाधिक सहभाग उल्लेखनीय ठरला.

जिल्ह्यात वर्ग ३ व ४ मधील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहे. संपाच्या चवथ्या दिवशी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व विभागाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. नेहरू मैदानातून निघालेल्या मोर्चाचे एक टोक इर्विन चौकात होते तर दुसरे टोक जयस्तंभ चौकात एवढी प्रचंड उपस्थिती मोर्चात होती. या व्यतिरिक्त प्रत्येक चौकात कर्मचारी समूहाने उपस्थित होते. ते मोर्चात सहभागी झाले.

या विराट मोर्चाने शहरातील वाहतूक एक ते दीड तासापर्यंत विस्कळीत झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी पुन्हा जुन्यापेन्शनसह इतरही प्रलंबित मागण्यांचा नारा बुलंद करण्यात आला.

Web Title: organizations hits the streets for 'old pension' scheme; Thousands of employees march on the collectorate office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.