शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संघटित प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 10:49 PM2017-09-03T22:49:57+5:302017-09-03T22:50:22+5:30
येत्या २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा निर्धार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येत्या २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा निर्धार आहे. तो पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी केले.
कृषी विज्ञान केंद्र (घातखेड), कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संकल्प से सिद्धी’ हा कार्यक्रम शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत अभियंता भवनात झाला. जिल्हा माहिती कार्यालयाचा ‘संवाद पर्व’ उपक्रमाचा सहभागही या कार्यक्रमात होता. श्रमसाफल्य फाऊंडेशनच्या अध्यक्ष वसुधा देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार विकास महात्मे, माजी महापौर विलास इंगोले, जि.प.सदस्य प्रकाश साबळे, संतोष महात्मे ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ, कार्यक्रम समन्वयक ए.पी. कळसकर, डीआयी हर्षवर्धन पवार, तालुका कृषी अधिकारी अनिल ठाकरे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कृषी संशोधक उपस्थित होते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. शासनाच्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोडही आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीतून दुर्बल घटकांतील किमान तीन व्यक्तींना मदत केली पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमात मुंबई येथील जे.के. ट्रस्टचे जयंत हजारिका यांनी तंत्रज्ञानाद्वारे गाईच्या गर्भाशयाबाहेर गर्भ उत्पादनातून दूध उत्पन्नात वाढ व पुणे येथील विवेक खलोकार यांनी मधुमक्षिका पालनाच्या संधी व महत्त्व यावर मार्गदर्शन केले.