संघटित कामगारांनी न्यायिक संघर्ष करावा
By admin | Published: January 31, 2017 12:27 AM2017-01-31T00:27:30+5:302017-01-31T00:27:30+5:30
देशात वीज उद्योगातील कामगार संघटित आहेत. मात्र ३२ हजार असंघटित कामगारांसाठी संघटित
भालचंद्र कानगो : आयटकच्या १८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात आवाहन
अमरावती : देशात वीज उद्योगातील कामगार संघटित आहेत. मात्र ३२ हजार असंघटित कामगारांसाठी संघटित कामगारांनी न्यायिक संघर्ष करावा. त्यांनी समान काम व समान वेतन देण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन कामगारनेते भालचंद्र कानगो यांनी केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शुक्रवारी आयोजित महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कसर्् फेडरेशन (आयटक)च्या तीन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटक संघटनेचे कार्याध्यक्ष सदरुद्दीन राणा, अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष मोहन शर्मा होते. यावेळी उपाध्यक्ष वि.डी.धनवटे, महेश जोतराव, प्रदीप मरूडकर, बाबालाल नाईकवाडी, अनिता झोपे, ज्योती नटराजन सल्लाऊद्दीन नाकोडे, लिलेश्वर बन्सोड यांच्यासह अनेक केंद्रीय पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणावर टीका करण्यात आली. ए.बी.बर्धन, ए.डी. गोलंदाज, शरद राव, सुलभा बम्हे आदी दिवंगतांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक सी.एन. देशमुख, संचालन महेश जाधव, सुरेश पाटील यांनी केले. यावेळी अनेक अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.