‘कॅन्सरला करा कॅन्सल’ विषयावर आज परिसंवादाचे आयोजन

By admin | Published: April 22, 2017 12:19 AM2017-04-22T00:19:31+5:302017-04-22T00:19:31+5:30

‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल यांच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या

Organizing seminars on "Cancer cancellation" topic today | ‘कॅन्सरला करा कॅन्सल’ विषयावर आज परिसंवादाचे आयोजन

‘कॅन्सरला करा कॅन्सल’ विषयावर आज परिसंवादाचे आयोजन

Next

तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती : महिलांमधील कर्करोगनिदान, प्रतिबंध विषयांवर होणार ऊहापोह
अमरावती : ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल यांच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणाऱ्या ‘कॅन्सरला करा कॅन्सल’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवार २२ एप्रिल रोजी अभियंता हॉल, शेगाव नाका चौक, अमरावती येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजता हा परिसंवाद होणार आहे. त्यात कोकिलाबेन हॉस्पिटलमधील प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ योगेश कुळकर्णी, डॉ.प्रणव चढ्ढा हे मार्गदर्शन करणार आहेत.
‘लोकमत’ने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या साथीने कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यावर तो बरा होऊ शकतो. हे समजावून या घातक आजाराबाबत लोकांच्या मनात रुजलेली भीती कमी करण्यासाठी याअंतर्गत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हा आजार कसा बरा झाला आणि रुग्ण सामान्य जीवन कसे जगू लागले, हे दाखविण्यासाठी कर्करोगावर मात केलेल्या व्यक्तींचे अनुभव यात मांडले जाणार आहेत. या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शना खाली आणि राज्यभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण अशा विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यामुळे पुर्णत: नियंत्रणात आल्याची उदाहरणे आपल्यापुढे आहेत. त्यामुळे या आजाराची लक्षणे समजून घेऊन योग्य वेळेत त्याचे निदान करुन घेणे, हाच कर्करोगाच्या विळख्यातून सुटण्याचा राजमार्ग आहे. मात्र ७० टक्के लोक याची माहिती घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. ‘आपल्याला कुठे हा आजार झाला आहे, मग कशाला घ्या त्याची माहिती!’ असा त्यांचा दृष्टिकोन असतो.
उर्वरित ३० टक्के लोक उत्सुकतेने याबाबत सर्व माहिती घेतात: परंतु या आजाराची सर्वच लक्षणे त्यांना स्वत:मध्ये दिसत असल्याचे त्यांना भासते. त्यामुळे ते अक्षरश: हादरून जातात. ही वेळ घेऊ नये, यासाठी या आजाराची सविस्तर माहिती या परिसंवादामध्ये देण्यात येणार आहे.
सखींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ९९२२४२७७९४, ९३२२१४४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Web Title: Organizing seminars on "Cancer cancellation" topic today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.