orshi

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:10 AM2021-06-03T04:10:35+5:302021-06-03T04:10:35+5:30

कोरोना दुस Morshi मोर्शी शहरातील नागरिकांना दिलासा कोरोना दुसरी लाट ओसरली नगर परिषद व आरोग्य यंत्रणेला यश गोपाल डाहाके। ...

orshi | orshi

orshi

Next

कोरोना दुस

Morshi

मोर्शी शहरातील नागरिकांना दिलासा

कोरोना दुसरी लाट ओसरली

नगर परिषद व आरोग्य यंत्रणेला यश

गोपाल डाहाके।

मोर्शी : शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून असलेले कडक लॉकडाऊन व येथील नगरपरिषद प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या वतीने सतत करीत असलेल्या परिश्रमातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्याने मोर्शी शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे

शहरांमध्ये गीता ठाकरे मुख्याधिकारी नगर परिषद मोर्शी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश ठाकरे, सुनील कोहळे, गोपाल वाघमारे, मोनील महाजन यांच्या नेतृत्वात गेल्या दोन महिन्यांपासून ऑन ड्युटी फिरते पथक संपूर्ण शहरांमध्ये कोरोना महामारी प्रतिबंध करण्यासाठी फिरत होते. त्यांच्या प्रयत्नांना आज यश येताना दिसून आले.

येथील जयस्तंभ चौकसह विविध चौकांमध्ये नगर परिषद व आरोग्य विभागामार्फत कोविड -१९ टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मोर्शीकरांना दिलासा मिळाला आहे.

या तपासणीमध्ये आशिष पाटील, हरीष निभोरकर व आरोग्य सहायक डॉ. व्ही. एस. नेवारे, डॉ. महेश जैस्वाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कळसकर, डॉ. हेमंत महाजन व मोशी पोलीस ठाण्यातील निरीक्षक तसरे साहेब व पोलीस सुभाष वाघमारे, मोहन बारब्दे, नगरपालिका अधिकारी मोनील महाजन, राजेश ठाकरे, प्रवीण रडके, सामाजिक कार्यकर्ता ज्योती प्रसाद मालवीय व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी प्रकाश मंगळे, योगेश पोहोकार, विनय शेलुरे, किरण ठाकरे, तुषार पोहोकार, आशिष नेरकर, पवन कडू, आदी कर्मचारी हजर राहून टेस्टिंग अभियान राबविण्यात आले.

मोर्शी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सरासरी आकडेवारी अशी, एप्रिल २०२१ या महिन्यांमध्ये सरासरी दर दिवसाला ३० ते ३५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या होती. १ मे २०२१ ते १६ मे २०२१ पर्यंत ४० ते ४५ दर दिवसाला पॉझिटिव्ह रुग्ण निघत होते. १६ मे ला अधिकतम एकाच दिवशी ४५ कोरोना पॉझिटिव्ह निघाले, तर १० मे ला ३९ पॉझिटिव्ह होते. मोर्शी शहराची सरासरी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या बघितली तर एप्रिल मध्ये ४०० ते ४५०, तर मे मध्ये ३०० ते ३५० अशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दिसून आली. परंतु, १७ मे पासून पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दर दिवसाला प्रमाण कमी झाले असून, १७ मे २०२१ ते २७ मे या कालावधीत दर दिवसाला ४ ते ५ रुग्णसंख्या दिसून आली व २८ आणि २९ मे ला पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ३ होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: orshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.