पांडेची अन्य विद्यार्थ्यांनींवरही होती वाईट नजर
By admin | Published: April 16, 2017 12:04 AM2017-04-16T00:04:13+5:302017-04-16T00:04:13+5:30
माझ्यात इन्ट्रेस असेल, तर माझ्याकडे त्या विद्यार्थिनीना आणत जा, असे भाष्य मनोज पांडेने पीडित विद्यार्थिनीसमोर केले होते.
विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण : महिला सेलला माहिती
अमरावती : माझ्यात इन्ट्रेस असेल, तर माझ्याकडे त्या विद्यार्थिनीना आणत जा, असे भाष्य मनोज पांडेने पीडित विद्यार्थिनीसमोर केले होते. पीडित मुलीची महिला सेलद्वारे चौकशी करण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब पुढे आली होती. त्यामुळे मनोज पांडे अन्य विद्यार्थिंनीवरही नजर ठेवून असल्याचे निदर्शनास येत आहे.
क्रिएटिव्ह अॅकेडमी नावाने कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या मनोज पांडेवर एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या विद्यार्थिनीप्रमाणे त्याने काही अन्य विद्यार्थिनींचेही लैंगिक शोषण केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पीडित विद्यार्थिनीने तक्रार देऊन आता दहा दिवस ओलांडले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत गाडगेनगर पोलिसांच्या हाती मनोज पांडे लागला नाही. गाडगेनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही पांडेच्या शोधातच आहेत. पांडेच्या नातेवाईक, मित्र मंडळी व त्याच्या संपर्कात असणाऱ्यांची चौकशी पोलिसांमार्फत सुरू आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक ठिकाणांची पोलिसांची झाडाझडती घेतली आहे. मात्र, तो राज्यबाहेर गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मनोज पांडे हा मूळचा बिहारचा असून त्याने सिंधी हिन्दी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्याने कोचिंग क्लासेसचा व्यवसाय सुरू केला. त्याने कोचिंग क्लासेसच्या उद्घाटनाप्रसंगी छापलेल्या पत्रिकेवर प्रोफेसर मनोज पांडे, बी.कॉम, एम.बीए., एम.कॉम. व ट्रक्ट एम.ए. ईकोनॉमी असे नमूद केले होते. त्यामुळे मनोज पांडे उच्च शिक्षीत असल्याचे निदर्शनास येते. मात्र, असे असतानाही त्याने शिक्षक व विद्यार्थिंनीच्या संबधाना काळीमा फासल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. पीडित विद्यार्थिनीची सर्वप्रथम महिला सेलद्वारे चौकशी करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी पीडित मुलीशी संवाद साधला असता मनोज पांडे हा अन्य विद्यार्थिंनींना प्रेमजाळ्यात अडकविण्यासाठी पीडित मुलीला सांगत होता. अन्य विद्यार्थिनींना जर माझ्यात ईन्ट्रेस असेल किंवा एखाद्या मुलीला मी आवडत असेल, तर त्या विद्यार्थिनीला माझ्याकडे आणत जात, असे भाष्य पांडेने पीडित मुलीकडे केल्याचे महिला सेलमधील पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीत निदर्शनास आले.