-तर ‘अड्डा २७’ चालकाविरुद्ध होऊ शकतो गुन्हा दाखल

By admin | Published: May 13, 2017 12:04 AM2017-05-13T00:04:56+5:302017-05-13T00:04:56+5:30

सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या संचालकाने सर्वप्रथम पोलिसांची दिशाभूल केली.

Otherwise, the 'Haunted 27' driver can be prosecuted | -तर ‘अड्डा २७’ चालकाविरुद्ध होऊ शकतो गुन्हा दाखल

-तर ‘अड्डा २७’ चालकाविरुद्ध होऊ शकतो गुन्हा दाखल

Next

पोलिसांची दिशाभूल : बाजार परवाना विभाग करणार का पोलीस तक्रार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सर्वच परवानगी असल्याची बतावणी करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या संचालकाने सर्वप्रथम पोलिसांची दिशाभूल केली. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांनी हुक्का पार्लरचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी महापालिकेच्या बाजार परवाना विभागाची परवानगी घेण्याची तसदीदेखील घेतली नाही. हा प्रकार कायदेभंग करणारा असून ही जबाबदारी असणाऱ्या बाजार परवाना विभागाने ‘अड्डा २७’ विरूद्ध पोलीस तक्रार केल्यास संचालकाविरूद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो.
पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत ‘अड्डा २७’च्या संचालकाजवळ केवळ सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले. त्या प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेतील बाजार परवाना विभागामार्फत अधिकृत परवाना मिळतो. ही व्यवसाय सुरू करतानाची प्राथमिक प्रक्रिया आहे. मात्र, ‘अड्डा २७’ च्या संचालकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजार परवाना विभागाची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील दस्तऐवज पोलिसांनी बाजार परवाना विभागाकडून मागविले आहेत.
‘अड्डा-२७’कडून कायद्याचा भंग झाल्याची पुष्टी पोलीस विभागाने केली असून पोलीस आयुक्तांनी हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, व्यवसायाबाबतचे अधिकार महापालिकेच्या बाजार परवाना विभागाकडे असल्याने बाजार परवाना विभागाकडून ‘अड्डा २७’वर काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैधरीत्या चालविल्या जाणाऱ्या ‘अड्डा-२७’मध्ये हुक्का पार्लरसह ‘डान्स बार’देखील चालविला जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. या अवैध व्यवसायाने अमरावतीच्या सुसंस्कृत परंपरेला डाग लागल्याने हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे.

प्राथमिक तपासणीत ‘अड्डा-२७’ जवळ परवाना नसल्याचे आढळून आले. याबाबत महापालिकेच्या परवाना विभागाकडून दस्तऐवज मागविले आहेत. त्यांनी या अवैध व्यवसायाची तक्रार दिल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त

Web Title: Otherwise, the 'Haunted 27' driver can be prosecuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.