शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 10:59 PM2019-02-03T22:59:24+5:302019-02-03T22:59:44+5:30

जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.

Ottoman | शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

शेतकऱ्यांना अनुदानावर मुरघास बनविण्याचे यंत्र

Next
ठळक मुद्देदुष्काळाशी लढा : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांना वितरीत करण्यात आले. यात कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविणारे यंत्राचा पुरवठा केला केला जाणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत ५० टक्के अनुदानावर मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे उपस्थितांना १६ जानेवारीचे शासन निर्णयानुसार सूचित करण्यात आले. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प मुंबई यांनी ९ जानेवारी २०१८ च्या पत्रान्वये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गंत घटक-भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करणे व विविध संस्था, व्यावसायिक बँका यांनी मूल्यांकन करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावना सहाय्य करणे अंतर्गत मुरघास बनविण्याचे मशीन पुरवठा करणे या बाबींचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पांतर्गंत जिल्ह्यामध्ये मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांचा पुरवठा केला जाणार आहे, त्याकरिता गरजू पशुपालकांनी संबंधित तालुक्याचे उपविभागीय कृषी अधिकाºयांकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेंतर्गंत लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या व प्रकल्पांतर्गंत गावातील कोणत्याही यंत्रणेकडे नोंदणी झालेले शेतकरी गट, स्वयंसहायता गट, बचत गट केवळ पात्र राहतील. शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या प्रकल्पास नोंदणीकृत बँक, वित्तीय संस्था यांचेकडून कर्ज मंजूर होणे आवश्यक आहे.
काय आहे मुरघास?
हिरव्या वैरणीतील उपलब्ध पोषण मूल्य घटकांचे जतन करण्यासाठी (हिरव्या वैरणीची प्रत व दर्जा कायम राखण्यासाठी) अतिरिक्त हिरवी वैरण योग्यवेळी कापणी करून वैरणीत ३० टक्के शुष्कांक (ड्रायमेंटर) व ७० टक्के आर्द्रता असताना कुट्टी करून सीलो पीट, सीलो बॅग्स, सीलो बॉल्समध्ये हवाबंद स्थितीत (अनअ‍ेरोबीक कंडीशन) मुरण्यासाठी, आंबविण्यासाठी (फरमेंटेश्न) साठविली जाते. या हिरवी वैरण साठविण्याच्या, टिकविण्याच्या पद्धतीला मुरघाट बनविणे असे संबोधिले जाते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातंर्गत भाडे तत्वावर कृषी अवजारे सेवा केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये मुरघास बनविण्याचे मशीनचा पुरवठा करण्यात येईल.
- डॉ. मोहन गोहत्रे
उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन

Web Title: Ottoman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.