आमचा रोजगार हिरावला हो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:06 PM2017-11-11T23:06:49+5:302017-11-11T23:07:32+5:30

विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून,.....

Our job is levied ...! | आमचा रोजगार हिरावला हो...!

आमचा रोजगार हिरावला हो...!

Next
ठळक मुद्देबहुरूपी समाजाचा टाहो : चोरांच्या दहशतीचा परिणाम; तक्रार करावी तरी कुणाकडे ?

वीरेंद्रकुमार जोगी।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विविध देवी-देवतांची सोंगे घेऊन मनोरंजनातून उदरनिर्वाह करणाºया बहुरूपी समाजाचा रोजगार चोरांच्या दहशतीमुळे हिरावला असून, गावागावांत फिरून लोककला जपणाºया या मंडळींसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. याची तक्रार करावी तरी कुणाकडे, असा त्यांचा सवाल आहे.
तिवसा तालुक्यातील कुºहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्डी येथे सहा बहुरूपींना मारहाण केल्याची घटना २४ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. मार्डीत आलेले बहुरूपी नव्हतेच. कारण त्यांनी स्त्रीवेश धारण केला होता. बहुरूपी कधीच स्त्रीवेष करीत नाहीत, असा दावा बहुरूपी समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. मात्र, यानंतर हे रोजगाराचे साधनच नष्ट झाल्यात जमा असल्याचे बहुरूपींचे मत आहे.
बहुरूपी स्वत:ला लोककलावंत मानतात. उदरनिर्वाहासाठी देव-देवतांची सोंगे घेतात. आख्यायिकांच्या माध्यमातून देवतांचे वर्णन करतात. ही परंपरा त्यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. त्यांचे कोणतेही लिखित साहित्य नाही, तर मौखिक व श्राव्य माध्यमातून पिढ्यान्पिढ्या बहुरूपी आपली कला जोपासत आहेत. बहुरूपींची नावे हिंदू-मुस्लिम धर्मीयांतील नावाची सरमिसळ असल्याने त्यांचा धर्म कोणता, जात कोणती, हे कळत नाही. आम्ही हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मातील सण साजरे करतो, असे बहुरूपी जनजागृती कला मंच संघटनेचे राजकपूर शमशेर पठाणेकर यांनी सांगितले.
छत्रपतींचा सेवक बहुरूपी
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरापगड जातींच्या लोकांना सोबत घेतले होते. त्यात बहुरूपी समाजाचाही समावेश होता. छत्रपतींना औरंगेजेबाने आग्य्रात नजरकैदेत ठेवले, त्यावेळी बहुरूपी बहिरजी नाईक यांनी त्यांचे वेशांतर केले होते. छत्रपतींसोबत कायम एक बहुरूपी असायचा, असे जाणकार बहुरूपी सांगतात.
शिक्षणापासून वंचित
बहुरूपी उदरनिर्वाहासाठी सोंगे घेऊन देशभर हिंडतो. कुटुबांचीही पायपीट सुरूच असते. अशातच मुलांना शिक्षण घेता येत नाही. एखाद्याने मुलाला शाळेत घातल्यास त्याला जातीचा उल्लेख असलेली शासकीय कागदपत्रे मागितली जातात. ती नसल्याने बहुरूपी समाजातील मुले शिक्षणापासून आजही वंचित आहेत.

आम्ही लोककला जपत आहोत. मात्र, गावात प्रवेश केल्यावर लोक संशयाच्या नजरेने पाहतात, आम्हाला चोर समजून गावातून हाकलून लावतात. अशा घटना वाढल्या आहेत.
- राजेश चांद औंदकर,
अध्यक्ष, बहुरूपी बहुउद्देशीय संस्था

Web Title: Our job is levied ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.