महापालिका कर्मचाऱ्यांचे २४ पासून बेमुदत कामबंद आंदोलन

By Admin | Published: June 18, 2015 12:20 AM2015-06-18T00:20:37+5:302015-06-18T00:20:37+5:30

प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी महापालिका कर्मचारी २४ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.

Out of 24 employees of the unarmed Kambandh movement | महापालिका कर्मचाऱ्यांचे २४ पासून बेमुदत कामबंद आंदोलन

महापालिका कर्मचाऱ्यांचे २४ पासून बेमुदत कामबंद आंदोलन

googlenewsNext

संपाचे हत्यार उपसले : आयुक्तांना घेरण्याची रणनीती आखली
अमरावती : प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी महापालिका कर्मचारी २४ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. त्याअनुषंगाने महापालिका कर्मचारी, कामगार संघाने प्रशासनाला पत्र देवून अवगत केले आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी स्थगित केलेला संप नव्याने आक्रमकपणे करुन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना घेरण्याची रणनिती कर्मचारी संघटना आखत आहे.
कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी ३१ मार्च २०१५ रोजी बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस बजावली होती. १७ एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्याचे ठरविले होते. दरम्यान या कालावधीत चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधींनी आयुक्तांसोबत चर्चा केली असता दोन महिन्यांचा कालावधी त्यांनी मागतिला होता. त्यानुसार आयुक्तांच्या शब्दाला मान देत दोन महिन्याचा कालावधी दिला. मात्र, दोन महिन्याचा कालावधी लोटला असताना आयुक्त गुडेवार यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या एकाही शब्दाचे पालन केले नाही, असा आरोप संघटनेने केलला आहे. तीन महिन्यांपासून वेतन नाही. प्रलंबित मागण्या कायम असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी २४ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रमेश पांडे, मंगेश वाटाणे, प्रल्हाद कोतवाल, मानविराज दंदे आदींनी घेतला आहे.

या प्रश्नांसाठी आहे आंदोलन
सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांचे एप्रिल, मे २०१५ पर्यंत थकीत वेतन, अंशदान सेवानिवृत्तीची रक्कम, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती, निमयबाह्य नियुक्त्या व प्रभारीपदे काढून टाकणे, १२ वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार कालबद्ध वेतनश्रेणी त्वरीत लागू करणे, कर्मचाऱ्यांना आरोग्य व अग्निशमन सेवेत सवलत देणे.

Web Title: Out of 24 employees of the unarmed Kambandh movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.