बियाण्यांसाठी ३७,३२९ अर्जांतून ४,२११ शेतकऱ्यांचेच नशीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:32+5:302021-06-04T04:10:32+5:30

अमरावती : यंदाच्या खरिपासाठी अनुदानित बियाणे मिळावे याकरिता ३७,३२९ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला होता. याचा ...

Out of 37,329 applications for seeds, only 4,211 farmers got lucky | बियाण्यांसाठी ३७,३२९ अर्जांतून ४,२११ शेतकऱ्यांचेच नशीब

बियाण्यांसाठी ३७,३२९ अर्जांतून ४,२११ शेतकऱ्यांचेच नशीब

googlenewsNext

अमरावती : यंदाच्या खरिपासाठी अनुदानित बियाणे मिळावे याकरिता ३७,३२९ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला होता. याचा तीन दिवसांपूर्वी ड्रा काढण्यात आला. यामध्ये सोयाबीन व तूर बियाण्यांसाठी ४,२११ शेतकऱ्यांचीच वर्णी लागली आहे. या सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे.

शेेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभाकरिता कृषी विभागाने आता महा-डिबीटी पोर्टलवर ’शेतकरी योजना’ या सदराखाली एकाच अर्जाद्वारे लाभ देण्यासाठी ही संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पायाभूत बियाणे निर्मिती याकरिता अर्ज करण्याची सुविधा कृषी विभागाने २४ मेपर्यंत उपलब्ध करून दिली. कृषी आयुक्त धीरजकुमार यांचा या योजनेवर अधिक भर होता. अनुदानित बियाण्यांकरिता सोयाबीनसाठी सर्वाधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. याकरिता झालेल्या ड्रा मध्ये फक्त २,३६४ शेतकऱ्यांचा नंबर लागला तर तूर बियाण्यांकरिता ५,४२३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाद्वारे नोंदणी केली होती. याचा आता ड्रा निघाला असता फक्त १,८१७ शेतकऱ्यांचा नंबर यामध्ये लागला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

पाईंटर

सोयाबीनसाठी तालुकानिहाय ड्रा

अमरावती : २६५

बातकुली : १५५

नांदगाव खंडेश्वर : २९५

चांदूर रेल्वे : १८८

धामणगाव रेल्वे : १९२

मोर्शी : १९९

वरुड : ४५

तिवसा : १७०

चांदूर बाजार : २०९

अचलपूर :१५९

अंजनगाव सुर्जी : १९८

दर्यापूर : १३३

धारणी : १२३

चिखलदरा : ३३

अनुदानित बियाण्यांसाठी आलेले अर्ज : ३७,३२९

लॉटरी किती जणांना लागली : ४,२११

कोट

महागडे बियाणे कसे परवडणार

कोट

बाजारात महागडे बियाणे असल्याने पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला. मात्र, नंबर लागलेला नाही. बाजारात महाबिजची २,२५० रुपयांची बॅग उपलब्ध नाही त्यामुळे खासगी कंपनीचे ३,००० रुपयांचे बियाणे विकत घ्यावे लागणार आहे.

- रावसाहेब खंडारे, शेतकरी

कोट

यासंर्दभात एसएमएस प्राप्त झालेला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून परमीट घेवून संबंधित दुकानामध्ये जावे लागणार आहे. त्यानंतर तेथून बियाणे मिळतील असे संगण्यात आले. परंतू बियाणे पुरेसे नसल्याने बाजारातूनही विकत घ्यावे लागेल.

रवि देशमुख, शेतकरी

Web Title: Out of 37,329 applications for seeds, only 4,211 farmers got lucky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.