डेंग्यूची साथ भराला, औषधसाठा तळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:08+5:302021-09-02T04:27:08+5:30
जिल्हा परिषद ; स्थायी समितीत सदस्य आक्रमक अमरावती : जिल्हाभरात डेंग्यू ,मलेरिया, हिवतापाचा उद्रेक झाला आहे. यात अचलपूर, मोर्शी ...
जिल्हा परिषद ; स्थायी समितीत सदस्य आक्रमक
अमरावती : जिल्हाभरात डेंग्यू ,मलेरिया, हिवतापाचा उद्रेक झाला आहे. यात अचलपूर, मोर्शी व बहुतांश तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.असे असतांना ग्रामीण भागात साथ रोगाचे नियंत्रणाला लागणारे फवारणीच्या औषधसाठयासह रूग्णांवर उपचारासाठीही औषध साठी नसल्याची गंभिर बाब १ सप्टेबर रोजी जिल्हा परिषद स्थायी समितीत माजी सभापती तथा सदस्य जयंत देशमुख यांनी उघडकीस आणली.या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप रणमले यांना दिले आहेत.
गत काही दिवसापासून ढगाळ वातावरण,तर कखी कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.दोन दिवसांपासून उकाडयाने नागरिक त्रस्त आहेत.अशात पावसाने हजेरी लावून काहीसा दिलासा दिला आहे. जिल्हाभरात डेंग्यू,व्हायरल फिव्हर चिकनगुनिया,टायफाईड अशा विविध आजाराचे रूग्ण मोठया संख्येने आढळून येत आहे. रुग्णालयातही गर्दी आहे. असे असताना ग्रामीण भागात हिवताप विभागाकडे फवारणीकरिता आवश्यक असलेल्या औषधाचा साठा नाही.परिणामी साथरोय नियंत्रणासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीही यामुळे हतबल झाल्या आहेत.विशेष म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रातही डेंग्यू आजाराचे रुग्णावर उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध नाही. औषध साठाच संपला तर डेंग्यू न अन्य साथीचे आजारा नियंत्रणात कसे येतील असा प्रश्न जयंत देशमुख यांनी सभेत मांडला. यावर अध्यक्ष बबलू देशमुख यांनी डीएचओंना जाब विचारत औषध साठा ३१ऑगस्ट रोजी संपला आहे. औषध खरेदीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे १२ लाख रुपयांची मागणी केली आहे. यातून लवकरच औषधी खरेदी केल्या जाणार असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर,पुजा आमले,सदस्य नितीन गोंडाणे, सुहासिनी ढेपे,सुनील डिके.सीईओ तुकाराम टेकाळे,मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,डे्प्युटी सीईओ कैलास घोडके, श्रीराम कुलकर्णी, प्रवीण सिन्नारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
बॉक्स
मेळघाटात प्रश्नही चर्चेत
धारणी येथील रुग्णालयात उपचारासाठी विविध आजारांचे रूग्ण दाखल आहेत. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी बालरोगतज्ज्ञ नसल्याने रुग्णांना गैरसोईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा सदस्या सीमा घाडगे यांनी मांडला. यावर तातडीने कारवाईचे निर्देश अध्यक्षांनी दिलेत.