धामणगाव तालुक्यात वीज देयकावरून ६५ गावांत आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:21+5:302021-09-25T04:12:21+5:30
१५ गावे अंधारात पंधराव्या वित्त आयोगातून देयक भरणे अवघड अडीच कोटीत कसे भरणार १३ कोटींची थकबाकी ग्राप व वीज ...
१५ गावे अंधारात
पंधराव्या वित्त आयोगातून देयक भरणे अवघड
अडीच कोटीत कसे भरणार
१३ कोटींची थकबाकी
ग्राप व वीज कंपनीत पेटला संघर्ष
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे
पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिव्यांची थकीत देयके भरण्याच्या राज्य सरकारच्या आदेशानंतर तालुक्यातील १५ गावांचा पाणी व पथदिव्यांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, ६५ गावांत वीज मंडळ व ग्रामपंचायतीतील संघर्ष वाढला आहे .
केंद्र सरकार ७५ टक्के व राज्य शासन २५ टक्के असलेल्या लोकसंख्येनुसार प्रतिव्यक्ती ४१२ प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना मिळाला आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या कर संकलनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना दैनंदिन खर्चही करणेही कठीण होत असल्याने त्यातच अनेक ग्रामपंचायतींचे सार्वजनिक वीज बिल आणि पाणीपुरवठा योजनांची बिले थकली आहेत. वीज वितरणकडून कनेक्शन कट होत असल्याने अनेक अडचणी येते आहेत. त्यामुळे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पथदिव्यांची आणि पाणीपुरवठा योजनांची देयके पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता दिली.
कामांना लागला ब्रेक
ग्रामपंचायतींना प्राप्त १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन व पाणी योजना दुरुस्तीची कामे घेणे, गाळ व्यवस्थापन प्रकल्प, मोठ्या ग्रामपंचायतींसाठी सेप्टिक टाकीमधील गाळ उपसण्याकरिता मशीन खरेदी करणे, प्राथमिक शाळा, अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांसाठी शौचालय बांधणे, हँडवॉश स्टेशन उभारणे, ग्रामपंचायत, मंदिर, इतर धार्मिक स्थळ, बाजार ठिकाण, एसटी स्टँड आदी कामांना ब्रेक लागला आहे.
वीज मंडळ, ग्रामपंचायतींत पेटला संघर्ष
धामणगाव तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींतर्गत १३४ पाणीपुरवठा कनेक्शनचे ३ कोटी ७४ लाख ५७७ रुपये वीज मंडळाला देणे आहे. सार्वजनिक पथदिव्यांच्या १०९ पुरवठ्याची ९ कोटी ४४ लाख ५६ हजार ३६० रुपयांची वसुली करायची आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा तालुक्याला पहिला हप्ता केवळ २ कोटी ३४ लाख ४९१ रुपये प्राप्त झाला यात पाणीपुरवठा की पथदिव्यांचे थकीत देयक भरायचे, यात वीज मंडळाने वीज कपातीची नोटीस बजावल्यानंतर १५ गावांतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाकडे तक्रार
वीज मंडळाला थकीत वीज बिलाचा धनादेश पाहिजे
पंधराव्या वित्त आयोगाचा सर्व निधी डीएससीने वापरण्याचे आदेश दिले, यात कोणतीही तरदूत नाही. त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही, असा पवित्रा ग्रामपंचायतींनी घेतला. सूरज शिशोदे, विशाल भैसे, संदीप इंगळे, स्नेहल कडू, समीर महल्ले, उमेश शिसोदे, मंगेश बोबडे, गोपिका चावरे, मनीषा रोकडे, सत्यभामा कांबळे, विशाल जयस्वाल, समीर धांडे, अंकुश मदनकार, दुर्गाबक्षसिंह ठाकूर, संगीता धोटे या सरपंच, उपसरपंचांनी घेतला आहे.
धामणगाव तालुक्यातील १३ कोटींच्या वसुलीसाठी वीज मंडळाने भरारी पथके नेमून नोटीस बजावली आहे. सात दिवसांची मुदत संपताच पाणी व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
यू. के. राठोड
उपविभागीय अभियंता
वीज मंडळ धामणगाव रेल्वे
ग्रामपंचायतची अवस्था बिकट आहे. त्यात वीज मंडळ जबरदस्तीने वसुली करीत आहे. कोणत्याही ग्रामपंचायतचा वीजपुरवठा तूर्तास तरी खंडित करू नये.
आ. प्रताप अडसड