खतांच्या दरवाढीविरोधात जनआक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:02+5:302021-05-21T04:14:02+5:30
फोटो पी २० वरूड वरूड : ऐन खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. ग्रामीण भागात त्याविरोधात ...
फोटो पी २० वरूड
वरूड : ऐन खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. ग्रामीण भागात त्याविरोधात जनआक्रोश उसळला आहे. ही दरवाढ मागे घेण्याची मागणी मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. याबाबत वरूड रासायनिक खतांची दरवाढ जवळजवळ दीड ते दुपटीने करण्यात आली आहे. अधिकृतरीत्या सरकारने दर वाढविले नसले तरी खत निर्माण करणाऱ्या कंपनी मात्र दरवाढ करून बसल्या आहेत. हा निर्णय शेतकरी बांधवांच्या मुळावर उठला आहे. शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून निदर्शने करावे लागतील आणि नंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस सरकार जबाबदार राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आक्रोशाची वाट न पाहता सध्या होत असलेली रासायनिक खतांची दरवाढ कमी करण्यात यावी, असे निवेदन वरूड पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, वरुड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाराव बहुरूपी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय निकम, मनोज इंगोले, राहुल चौधरी, नरेंद्र पावडे, सुधाकर दोड, नगरसेवक धनंजय बोकडे, बंटी रडके, कोमल पांडव, सविता काळे, रंजना मस्की, भूषण बेहरे, तुषार दंदी, अशोक कुरवाळे, शुभम कुरवाळे, विलास कुरवाळे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.