दहा हजारांवर विद्यार्थी देणार जवाहर नवोदयची आज परीक्षा
By जितेंद्र दखने | Published: January 19, 2024 08:07 PM2024-01-19T20:07:26+5:302024-01-19T20:07:35+5:30
जिल्ह्यात ४२ परीक्षा केंद्र, ११:३० ते १:३० या वेळेत पेपर
अमरावती: जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा २० जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर सकाळी ११:३० ते १:३० या वेळेत यंदा इयत्ता पाचवीमध्ये शिकणारे १० हजार ५५९ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
गतवर्षी सन २०२३ मध्ये ७४१९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यंदा ३१४० परीक्षार्थी वाढल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. प्रवेश परीक्षेच्या हॉल तिकीट समितीकडून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले असून, परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्याचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सांगितले.
केंद्र संख्या -४२
परीक्षार्थी -१०५५९
केंद्र संचालक-४२
लिपीक-१२५
पर्यवेक्षक-४४०
शिपाई-२६४