शेततळे निर्मितीने ७५ टक्के पल्ला गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:58 PM2018-04-05T21:58:27+5:302018-04-05T21:58:27+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हाभरात यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली.

 Over 75 percent of the farmland production reached | शेततळे निर्मितीने ७५ टक्के पल्ला गाठला

शेततळे निर्मितीने ७५ टक्के पल्ला गाठला

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : दर्यापूर लक्ष्य, शंभर टक्क््यांसाठी ३० एप्रिलपर्यंत डेडलाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेले जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्हाभरात यंत्रणेने उत्कृष्ट कामगिरी बजावली.विशेषत: शेततळे निर्मितीने ७५ टक्के पल्ला गाठला असून, उर्वरित २५ टक्के निर्मितीसाठी ३० एप्रिलपर्यंत ‘डेडलाईन’ आहे. दर्यापूर तालुक्यात सर्वाधिक शेततळ्यांची निर्मिती केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी बांगर हे सलग दोन दिवसांपासून महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत. उन्हाचा पारा वाढत असताना जलयुक्त शिवार योजना व शेतकºयांच्या मागणीनुसार शेततळे निर्मितीसाठी ते स्वत: लक्ष घालत आहेत. जिल्ह्यात ४५०० शेततळे निर्मितीचे लक्ष्य होते. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वन्यातून दर्यापूर तालुक्यात १४२८ शेततळे निर्माण करता आले. ३० एप्रिलपर्यंत दर्यापूर तालुक्यात दोन हजार शेततळे निर्मितीचे लक्ष्य पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला. अचलपूर, तिवसा, नांदगाव खंडेश्र्वर, धारणी, चिखलदरा, अमरावती, धामणगाव रेल्वे, वरूड, मोर्शी, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे आदी तालुक्यांतील शेतकºयांच्या मागणीनुसार शेततळे मंजूर करण्यात आले. मात्र, खारपाणपट्टा असलेल्या भागात शेततळे निर्मितीस प्राधान्य दिले जात असून भविष्यात ते दर्यापूर तालुक्यासाठी वरदान ठरेल, असे ते म्हणाले. शासनाकडून शेततळे निर्मितीसाठी निधी उपलब्ध असून, शेतकºयांची मागणी येताच प्रक्रियेअंती शेततळे निर्मितीसाठी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. या योजनेच्या पूर्णत्वासाठी जानेवारीपासून वेग आला आहे. तलाठी, कृषी सहायकांनी मोलाची कामगिरी बजावली. शेततळे निर्मितीचे लक्ष्य ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करून तसा अहवाल शासनाकडे पाठविला जाईल, असे जिल्हाधिकारी बांगर म्हणाले.

Web Title:  Over 75 percent of the farmland production reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.