जिल्ह्यात आठ लाखांवर वाहने, प्रदूषण चाचणी केवळ हजार वाहनांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:17+5:302021-01-10T04:11:17+5:30

अमरावती: संदीप मानकर जिल्ह्यात आरटीओच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, तसेच ट्रक, ट्रॅक्टर व इतर प्रकारची वाहने ...

Over eight lakh vehicles in the district, pollution test of only a thousand vehicles! | जिल्ह्यात आठ लाखांवर वाहने, प्रदूषण चाचणी केवळ हजार वाहनांचीच!

जिल्ह्यात आठ लाखांवर वाहने, प्रदूषण चाचणी केवळ हजार वाहनांचीच!

Next

अमरावती: संदीप मानकर

जिल्ह्यात आरटीओच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत, दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, तसेच ट्रक, ट्रॅक्टर व इतर प्रकारची वाहने असे एकूण ८ लाख १२ हजार ७४४ वाहनांची आरटीओकडे नोंद आहे. मात्र, आठ लाखांवर वाहनांची नोंद असताना गतवर्षी १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान आरटीओच्या पथकाने पीयूसी (प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र) फक्त ९३९ वाहनांची केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतर वाहने प्रदूषण करीत धावत आहे की काय? असा सवाल नागरिकांचा आहे. ९३९ वाहनांची गतवर्षी पीयूसी संदर्भात आरटीओच्या पथकाने तपासणी केली. त्यापैकी १०८ जप्त केली. ३१३ वाहने तपासणीअंती दोषी आढळून आली. अशा वाहन चालकांकडून ३ लाख १९ हजार ५०० रुपयांची दंडात्मक तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याचे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान ५०० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७ वाहने जप्त केली, तर १३१ दोषी आढळून आल्याने वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाईअंती त्यांच्याकडून १ लाख १६ हजारांची तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची नोंद आहे.

नवीन वाहने खरेदी केल्यानंतर त्या वाहनधारकांना वर्षभर पीयूसी प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, इतर वाहनांना दरवर्षी वाहनांची प्रदूषण चाचणी करून घेणे अनिवार्य असते. यासंदर्भात वाहतूक पोलीससुद्धा कारवाई करतात. विना पीयूसी धावणाऱ्या वाहनांवर कारवाईंचा बडगा उगारण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यातील एकूण वाहने- ८,१२,७४४

जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- ३६

असे आहेत प्रदुषित वाहने तपासणीचे दर ( रूपये)

चारचाकी वाहने (पेट्रोल) - ९०

चारचाकी वाहने (डिझल) -११०

तीन चाकी वाहने (पेट्रोल) - ७०

दुचाकी -३५

कुठल्या वाहनांना किती दंड

कार - १०००

जीप -१०००

ट्रक - १०००

दुचाकी -१०००

बॉक्स:

पीयूषी केली नाही म्हणून ३१३ वाहनांना दंड

वाहनांची पीयूषी केली नाही म्हणून गत वर्षी फक्त ९३९ वाहनांची तपासणी करण्यात आली.

मात्र त्यामध्ये ३१३ वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून तीन लाखांच्यावर तडजोड शुल्क वसूल करण्यात आली. मात्र ज्यांनी तडजोड शुल्क भरला नाही व पीयूषीच्या निकषात न बसलेले १०८ वाहने आरटीओच्या भरारी पथकाने जप्त केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली.

कोट आहे.

Web Title: Over eight lakh vehicles in the district, pollution test of only a thousand vehicles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.