कोरोना विरोधातील लढ्यात चार हजारांवर कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:06+5:302021-05-14T04:13:06+5:30

गावोगावी वॉच : कोरोनाबाधित रुग्णावर वॉच अमरावती : कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत जिल्हा परिषदेकडील डॉक्टर, आरोग्यसेवक, सेविका, आशा, ...

Over four thousand employees in the fight against Corona | कोरोना विरोधातील लढ्यात चार हजारांवर कर्मचारी

कोरोना विरोधातील लढ्यात चार हजारांवर कर्मचारी

Next

गावोगावी वॉच : कोरोनाबाधित रुग्णावर वॉच

अमरावती : कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत जिल्हा परिषदेकडील डॉक्टर, आरोग्यसेवक, सेविका, आशा, अंगणवाडीसेविकांसह चार हजारांवर कर्मचारी राबवत आहे. गावाची स्वच्छता, औषध फवारणी, बाहेरून आलेल्या हजारो नागरिकांवर हे कर्मचारी वॉच ठेवत आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ग्राम दक्षता समित्या व जिल्हा परिषदेची आरोग्य व अन्य विभागाची यंत्रणाही या लढ्यात काम करीत आहे. जिल्हा परिषदेचे डॉक्टर व कर्मचारी जीव धोक्यात घालून अखंडित सेवा देत आहेत. कोरोनाची परिस्थती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेची यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. गावात होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णावर वॉच त्याच्या आरोग्याकडे आरोग्य विभागाची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱी माहिती घेत आहेत. ग्रामीण भागातील ही सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करते का यावर नजर ठेवण्यात जिल्हा परिषदेतील वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत त्या सर्वांना प्रत्येक तालुक्याची जबाबदारी दिली आहे.

बॉक्स

शंभर रुग्णवाहिका

जिल्हा परिषदेकडे जवळपास शंभर रुग्णवाहिका आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आदी मिळून ९४ रुग्णवाहिका सेवेत सज्ज आहेत. सर्व रुग्ण्वाहिकेत रुग्ण दाखल करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी माक्स, हँडग्लोज, सॅनिटायझर, तसेच पुरेशा औषधासाठी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विभागामार्फत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झेडपी अध्यक्ष, बबलू देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सीईओ अविश्यांत पंडा, आदींचे वेळोवेळी सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

बॉक्स

अशी राबते जिल्हा परिषद यंत्रणा

ग्रामीण भागात

नियमित डॉक्टर्स १९४, हंगामी डॉक्टर्स १००, आरोग्यसेविका २५०, सेवक १८०, टीएमओ १४, पर्यवेक्षक ७४, सुपरवायझर १४ यांच्यासह आशा वर्कर्स २०८१, अंगणवाडी सेविका दोन हजार ५३२, मदतनीस २ हजार ३६६, ग्रामपंचायत कर्मचारी १२२० सेवेत आहेत. यासोबत ग्रामसेवकांचेही सहकार्य लाभत आहे.

Web Title: Over four thousand employees in the fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.