१०८ वर्षांपूर्वीच्या विजयस्तंभाची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:47 PM2019-01-25T22:47:33+5:302019-01-25T22:48:20+5:30

स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने डागडूजी करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

Overwhelming 108 years ago victory | १०८ वर्षांपूर्वीच्या विजयस्तंभाची अवहेलना

१०८ वर्षांपूर्वीच्या विजयस्तंभाची अवहेलना

Next
ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने डागडूजी करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
या ठिकाणी तब्बल ७० वर्षांपासून ध्वजारोहण करण्याची परंपरा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते राम बुरंगे यांनी सांगितले. त्यांनी या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु, प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही.
स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण करण्याचा मान पुरुष मंडळींना तर प्रजासत्ताकदिनी तो मान महिलांकडे असल्याची परंपरा होती, असे जाणकार अभिमानाने सांगतात. परंतु, या ठिकाणी १ जानेवारी २०१७ रोजी प्रेक्षागृह बांधण्यात आले. या ठिकाणी पूर्वी खेळाचे प्रांगण होते. या परिसरातील नागरिक स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनाला एकत्र येऊन या विजयस्तंभासमोर ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देत होते. चार वर्षाआधी हा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आल्याने त्याची अवहेलना होत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली. या ठिकाणचे ध्वजारोहण बंद झाल्याची भावनाही नागरिकांच्या मनात धगधगत आहे. महापालिकेने या ठिकाणी पुन्हा सन्मानपूर्वक विजयस्तंभ उभारावा व या विजयस्तंभावर पुन्हा तिरंगा फडकविण्यात यावा, अशी मागणी राम बुरंगे यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बीड धातुपासून निर्मिती
खरकाडीपुऱ्यात डोलाऱ्यात उभा असलेला विजयस्तंभ बीड धातूपासून तयार करण्यात आला होता. ब्रिटिशकालीन काळात या विजयस्तंभावर दिवाबत्तीची सोय करण्यात आली होती. जेनेकरुन रात्री पादचाºयांचे मार्गक्रमण सूकर व्हावे,त्यांना दिशा कळावी, अशी त्यामागील भूमिका होती. स्वातंत्र्यानंतर स्थानिकांनी जल्लोष करुन छोटेखानी सभेचे याच ठिकाणी आयोजन केले होते.विजयस्तंभावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला होता.

१०८ वर्षापुर्वीचा विजयस्तंभ मागील चार वर्षांपुर्वी ध्वस्त करण्यात आला. जतनाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून विजयस्तंभाचे पावित्र्य जपायलाच हवे.
- राम बुरंगे,
सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Overwhelming 108 years ago victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.