वन जमिनीवरील ‘त्या’ रहिवाशांना मिळेल मालकी हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:00+5:302021-09-06T04:17:00+5:30

अमरावती : गत काही वर्षांपासून वनजमिनीवर असलेल्या संजय गांधीनगर, पंचशीलनगर येथील रहिवाशांच्या मालकी हक्काचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. ...

Owners of forest land will get ownership rights | वन जमिनीवरील ‘त्या’ रहिवाशांना मिळेल मालकी हक्क

वन जमिनीवरील ‘त्या’ रहिवाशांना मिळेल मालकी हक्क

Next

अमरावती : गत काही वर्षांपासून वनजमिनीवर असलेल्या संजय गांधीनगर, पंचशीलनगर येथील

रहिवाशांच्या मालकी हक्काचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री अश्विनी

चौबे यांच्या आदेशानुसार आता लवकरच या वनखात्याच्या जमिनीचे मालकी हक्क येथील रहिवाशांना

मिळणार आहे. यासंदर्भात खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने

पाठपुरावा केला आहे.

राणा दाम्पत्याच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून अमरावती महापालिका हद्दीलगतच्या वनपरिक्षेत्रात असणारे

वन्यपशू व हिंस्त्र जनावरे शहरात येतात. शेतीचे नुकसान करतात. त्यांच्यामुळे नागरिकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. पिकांचे सातत्याने वन्यपशूंमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अंजनगाव बारी, गोविंदपूर, भानखेडा, वडद, छत्री तलाव, वडाळी परिसर आदी भागातील वनपरिक्षेत्र नगर वन योजनेंतर्गत अभयारण्य किंवा प्राणिसंग्रहालय घोषित करून १३५ कोटी रुपये खर्च करून संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपण करण्यात यावे. यामुळे जीविताचे व शेतीचे रक्षण होईल आणि स्थानिकांना रोजगारसुद्धा मिळेल, असा प्रस्ताव आमदार राणा यांनी सादर केला. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी यांनी तात्काळ मंजुरी देऊन निधीसुद्धा मंजूर केला.

--------------

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पुनर्वसित नागरिकांना घरकुल द्या

धारणी व चिखलदरा परिसरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील १५० ते २०० गावे येतात. वन्यपशूंमुळे स्थानिकांचा संघर्ष उभा ठाकला आहे. ग्रामस्थांच्या सुरक्षितता व पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना स्थलांतरित करून पुनर्वसन करण्यासाठी या गावातील नागरिकांना इतरत्र शेतीच्या बदल्यात शेती, प्रतिव्यक्ती १५ लाख रुपये व पंतप्रधान आवास योजनेंअतर्गत निवारा घरकुल आदी देण्याची मागणी खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केंद्रीय वनमंत्री अश्विनी चौबे यांच्याकडे केली.

--------------------

Web Title: Owners of forest land will get ownership rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.