ऑक्सिजनअभावी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, रेकाॅर्डवर नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:13 AM2021-07-29T04:13:31+5:302021-07-29T04:13:31+5:30
अमरावती : करोनाच्या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर व्यक्तींना संसर्ग झाला. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर झाली. यावेळी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मोठी ...
अमरावती : करोनाच्या दुसऱ्या लाटेत ७० हजारांवर व्यक्तींना संसर्ग झाला. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर झाली. यावेळी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची मोठी समस्या निर्माण झाली होती. या लाटेत काही रुग्णांचे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा आरोप मृतांच्या आप्तांकडून होत आहे. मात्र, अशा मृत्यूची नोंदी शासकीय व खासगी रुग्णालयांकडे नसल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाममुळे कोणाची आई तर कुणाचे वडील, कुणाचे भाऊ बहीण या संकटाने हिरावले आहे. मृत्यूसाठी वेगवेगळी कारणे दर्शविण्यात येत असली तरी रुग्णालयाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईकांकडून केल्या जात आहे.
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रोज नोंद होणारे एक हजारांवर रुग्ण व लगतच्या नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ तसेच मध्यप्रदेशातूनही गंभीर रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल झालेत. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर कमी पडले होते. ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचेही नाकारता येत नाही. काही रुग्णांचे नातेवाईकांद्वारा असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आरोग्य विभाग म्हणतो रुग्णांच्या मृत्यूची तशी नोंद नाही. किंबहुना याविषयी आरोग्य विभागाकडे तशी तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.
पाईंटर
एकूण रुग्ण : ९६,४९२
बरे झालेले : ९४,८४३
उपचार सुरू : ८८
मृत्यू : १,५६१
बॉक्स
‘त्या’ दिवशी काय घडले
*नागपूर जिल्ह्यातून येथे एप्रिल महिन्यात उपचाराला आलेल्या संक्रमितांचा एचआरसीटी स्कोर १९ होता व ऑक्सिजनचे प्रमाण ६० ते ६५ चे दरम्यान होते. *दोन रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने दाखल करण्यास नाकारले. अन्य एका रुग्णालयात बेड मिळाला. मात्र, ऑक्सिजन वेळेवर मिळाला नाही.
*त्या रुग्णाचा लगेच मृत्यू झाला, याच महिन्यात काही रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णांचे सहा तासात काही मृत्यू झालेले आहेत.
बॉक्स
कुटुंबीय म्हणतात
पती
रुग्णाला थोडे घाबरल्यासारखे वाटत होते, श्वास घ्यायला त्रास होत होता. आत प्रवेश नसल्याने आम्ही सर्व रुग्णालयाचे बाहेर होतो. आम्ही डॉक्टरांना याची कल्पना दिली, मात्र, डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला नाही. शेवटी गंभीर स्थिती झाल्यावर झाल्यावर सावरासावर करण्यासाठी ऑक्सिजन लावला. मात्र, उशीर झाला होता.
भाऊ
रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर आहे, असे माहित असतांना ऑक्सिजन लावण्यात आलेला नव्हता, हलगर्जीपणा केला. त्याचवेळी अन्य रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आल्याचे आम्हाला रुग्णांकडून समजले. काहींनी अधिकारी व राजकीय व्यक्तींचा दबाब आणल्यावर त्यांची सुविधा करण्यात आली. आमच्या रुग्णाकडे मात्र, दुर्लक्ष करण्यात आले.
कोट
ऑक्सिजनचा तुटवडा आपल्याकडे नव्हता. त्यामुळे ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही व तशी नोंदही नाही. मृत रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावना असतात. मात्र, प्रत्यक्षात तसे झालेले नाही.
- डॉ श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक