जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 05:00 AM2021-04-26T05:00:00+5:302021-04-26T05:00:53+5:30

कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मिती चालना मिळाली आहे.

Oxygen production will take place at five places in the district | जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती

जिल्ह्यात पाच ठिकाणी होणार ऑक्सिजन निर्मिती

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या प्रयत्नाना यश, प्रकल्प उभारणीच्या कामाला गती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती  : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे धारणीसह पाच ठिकाणी वैद्यकीय दर्जाचा प्राणवायू निर्माण होऊन गरजू रुग्णांसाठी त्याचा उपयोग होईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी सांगितले.
कोरोना साथ लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध कामांना गती दिली. कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान ऑक्सिजनची गरज पूर्ण व्हावी म्हणून कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ई-टेंडर प्रक्रिया करण्यात आली होती. ती प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रकल्प निर्मिती चालना मिळाली आहे. ना. ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले व  प्रकल्प निर्मितीसाठी पालकमंत्र्यांनी वेळोवळी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने प्रकल्प निर्मिती कार्याला वेग आला आहे.
कोरोनाग्रस्तांना तातडीने प्राणवायू उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा कोविड रुग्णालयासह पाच ठिकाणी  प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला २५९ ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा होणार आहे. ऑक्सिजन निर्मिती केंद्राची उभारणी होत असल्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघणार आहे.

शासकीय रुग्णालयांना दिलासा
विभागीय संदर्भ रुग्णालयातील जिल्हा कोविड रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अचलपूर उपजिल्हा रुग्णालय, धारणी उपजिल्हा रुग्णालय, तिवसा ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्राणवायू निर्मिती केंद्रात अनुक्रमे ८८ ऑक्सिजन सिलिंडर, ५८ सिलिंडर, ४४ सिलेंडर, १९ सिलिंडर, १९ सिलेंडर व ३१ सिलिंडर अशी एकूण २५९ ऑक्सिजन सिलिंडर निर्मिती होणार आहे. 

जागतिक मापदंडानुसार होणार उभारणी
प्राणवायू प्रकल्प निर्मिती ही जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार व मार्गदर्शक सूचनेनुसार केली जाणार आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स, ऑक्सिजनचे उत्पादन ठरलेल्या मापदंडानुसार घेतले जाणार आहे. त्यानुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले. 

 

Web Title: Oxygen production will take place at five places in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.