ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेडिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:12 AM2021-04-18T04:12:25+5:302021-04-18T04:12:25+5:30

अमरावती : कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारा रेमडेसिविरचा सद्यस्थितीत ठणटणाट व ऑक्सिजनचा जेमतेमच साठा आहे. यासोबतच कोरोना प्रतिबंधक ...

Oxygen, Remedivirus also at the wedding! | ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेडिंगवर!

ऑक्सिजन, रेमडेसिविर अन् लसही वेडिंगवर!

Next

अमरावती : कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणारा रेमडेसिविरचा सद्यस्थितीत ठणटणाट व ऑक्सिजनचा जेमतेमच साठा आहे. यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील १०० चेवर केंद्र बंद आहेत. त्यामुळे कोरोनाशी कसे लढणार, असा नागरिकांचा सवाल आहे.

कोरोनावर सध्या रेमडेसिविर इंजेक्शन गुणकारी असल्याने गंभीर रुग्णांचा पाच इंजेक्शनचा कोर्स केला जातो. जिल्ह्याला रोज दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी असताना चार दिवसांपूर्वी ७०० इंजेक्शन उपलब्ध झाले आणि त्याच दिवशी संपले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या डोससाठी इंजेक्शन कुठून आणावे, असा रुग्णांच्या नातेवाईकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑक्सिजनचा पुरवठाही जेमतेम होत आहे. अद्याप कमी पडला नसला तरीही पुरेसा नाही. ही यंत्रणांची खंत आहे. यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम लक्ष देऊन आहेत. जिल्हा बाहेरील रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने शासकीय अन् खासगी रुग्णालयात बेडच तुटवडा अलीकडे जाणतो आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत लसीकरण महत्त्वाचे आहे. सुरुवातीला मोठ्या प्रमाणात लसीचा साठा होता, मात्र, लसीकरणाचे आणखी दोन टप्पे वाढविले असताना डोसेसचा मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील १२५ पैकी ७० केंद्र बंद आहेत. रविवारी आणखी ३० ते ४० केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे.

बॉक

बॉक्स

रेमडेसिविरचा पुरवठाच नाही, वाटपाचे केंद्रही बंद

जिल्ह्यात दोन ते अडीच हजार इंजेक्शनची मागणी रोज होत आहे. त्यातुलनेत एका आठवड्यात फक्त १४५० व्हायल जिल्ह्याला मिळाले आहे. व्यावसायिकांनी ३० लाखांचा ॲडव्हांस डेपोकडे जमा केलेला असताना अद्याप पुरवठा झालेला नाही. त्यामुळे येथील पीडीएमएमसीतील केंद्रात मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या.

पुढे काय? शनिवारी पीडीएमएमसी केंद्रात ४५० इंजेक्शन उपलब्ध झाले. याशिवाय आवश्यक व्हायल पुरवठ्याची प्रतीक्षा आहे.

बॉक्स

सुपरस्पेशालिटीला रोज लागतो ४.५ टन ऑक्सिजन

येथील सुपरस्पेशालिटीमधील जिल्हा कोविड रुग्णालयात रोज चार टन ऑक्सिजन लागतो. शनिवारी ४.११ टन ऑक्सिजन उपलब्ध होता. येथे ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रोज लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने अद्याप तरी टंचाई नसली तरी सध्या असणारा पुरवठा जेमतेम असल्याची स्थिती आहे.

पुढे काय : शासकीय रुग्णालयात सध्यातरी पुरेसा साठा होत असला तरी हे रुग्णालय पुरवठादारावरच अवलंबून आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील १०० लसीकरण केंद्र साठ्या अभावी बंद

जिल्ह्यात शनिवारी कोव्हक्सीनचे चार हजार डोज शिल्लक आहेत. याचा दिवसभर वापर झाल्यानंतर हा साठा संपणार आहे तर कोव्हक्सीनचा साठा चार दिवसांपूर्वीच संपुष्ठात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १०० चेवर केंद्र रविवारपासून बंद राहणार असल्याने जिल्ह्यात लस महोत्सवाची वाट लागली आहे.

पुढे काय : जिल्ह्यात चार ते पाच हजार कोव्हक्सीनचे डोज प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे २५ केंद्र सुरु राहतील.

कोट

०००००००

००००००

०००००००००

०००००००००००

शैलेश नवाल

जिल्हाधीकारी

Web Title: Oxygen, Remedivirus also at the wedding!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.