पद्माकर सोमवंशी ‘आयएमए’चे नवे उपाध्यक्ष

By admin | Published: February 23, 2016 12:05 AM2016-02-23T00:05:15+5:302016-02-23T00:05:15+5:30

एमबीबीएस, एमडी डॉक्टरांची बलाढ्य संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन ‘आयएमए’ अमरावती शाखेच्या उपाध्यक्षपदी पद्माकर सोमवंशी निवडून आले आहेत.

Padmaakar Somvanshi is the new vice president of 'IMA' | पद्माकर सोमवंशी ‘आयएमए’चे नवे उपाध्यक्ष

पद्माकर सोमवंशी ‘आयएमए’चे नवे उपाध्यक्ष

Next

चुरसपूर्ण लढत : जावरकरांचा पराभव
अमरावती : एमबीबीएस, एमडी डॉक्टरांची बलाढ्य संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन ‘आयएमए’ अमरावती शाखेच्या उपाध्यक्षपदी पद्माकर सोमवंशी निवडून आले आहेत. त्यांनी अजय जावरकर यांचा ९५ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या या चुरशीच्या लढतीकडे डॉक्टरांचे लक्ष लागले होते.
उपाध्यक्षपदाच्या नावावर आयएमए अमरावतीमध्ये सहमती न झाल्याने २१ फेब्रुवारीला स्थानिक आयएमए हॉलमध्ये निवडणूक घेण्यात आली.
आयएमएचे नियोजित अध्यक्ष वसंत लुंगे यांच्या नेतृत्वात पद्माकर सोमवंशी व महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष उद्धव देशमुख यांच्या गटाकडून अजय जावरकर हे उपाध्यक्षपदासाठी समोरासमोर ठाकले. एकूण ६७० आजीवन सदस्य असलेल्या आयएमए अमरावती शाखेतील ५१९ डॉक्टर्सनी मतदानात भाग घेतला.

Web Title: Padmaakar Somvanshi is the new vice president of 'IMA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.