शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाविरोधात प्रहार आक्रमक

By admin | Published: August 18, 2015 12:22 AM2015-08-18T00:22:59+5:302015-08-18T00:22:59+5:30

राज्य सरकारने शिफारस केलेल्या व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावामधील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून देण्यात यावी ...

Pahar aggressor against the issue of farmers protest against the government | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाविरोधात प्रहार आक्रमक

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाविरोधात प्रहार आक्रमक

Next

आंदोलन : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण
अमरावती : राज्य सरकारने शिफारस केलेल्या व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावामधील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी प्रहारने आ. बच्चू कडू यांच्या नेतुत्वात सोमवारी एक दिवसीय उपोषण करून जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.
राज्य शासनाने एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा, २४ जुलै २०१५ रोजी शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित असलेल्या गरीब लाभार्थी, भूमिहीन, विधवा, अपंगाना समाविष्ट करून योजनेचा लाभ द्यावा, शेतकऱ्यांना दोन रूपये किलोचे धान्य देण्या ऐवजी त्यांना अनुदान म्हणून रोख रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांसाठी जिल्हाकचेवरी समोर प्रहारने एक दिवसीय उपोषण करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान आंदोलन स्थळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर व तहसिलदार सुरेश बगळे यांनी प्रहारचे निवेदन स्विकारून सदर निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. बच्चू कडू, जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू, शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, चंदू खेडकर, जोगेंद्र मोहोड, मंगेश देशमुख, शंभु मालठाणे, प्रवीण हेंडवे, प्रवीण मुंदडा, बाळासाहेब वाकोडे, पिंटू टापरे, गजू भुगूल , रणजित खाडे, रवींद्र वैद्य, भारत उगले, प्रभाकर वानखडे, सोपान गोडबोले, अज्जु पठाण, राजू भिवगडे अविनाश सुरंजे भाष्कर मासोदकर, मनोज तसरे, दिनेश वसरे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Pahar aggressor against the issue of farmers protest against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.